Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक

मिरजगाव शेतजमीन हडपल्या प्रकरण

कर्जत । वीरभूमी - Jan 18, 2022 • 10:28 AM 1186 views
बनावट महिला उभी करून मिरजगाव येथील शेतजमीन विक्री प्रकरणातील पुण्यातील फरार आरोपीस अखेर कर्जत पोलिसांनी जेरबंद केले. सदरचा आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. या धोकाधडीमध्ये आंबीजळगाव येथील विद्यमान लोकानियुक्त सरपंचाचा समावेश असल्याने सदरील प्रकरण कर्जत तालुक्यासह जिल्हयात गाजले होते.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजगाव येथील फिर्यादी निर्मला हिराचंद गांधी यांची शेत गटनं. 66/2 मधील 2 हेक्टर 18 पैकी 20 गुंठे शेतजमीन स्वताच्या आर्थीक फायदयाकरीता बनावट महिला उभी करून यासह बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवत वरील 20 गुंठ्याची बनावट खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला होता. सदर खरेदी करताना बनावट असल्याचे माहित असतांना सुद्धा आर्थीक फायदयासाठी फिर्यादीची फसवणूक करण्यात आली होती.

याबाबत फिर्यादी निर्मला गांधी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात 30 जाने 2020 रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये आरोपी ज्ञानेश्वर शेषराव मोहिते (मुळ रा. गोसेगाव, ता. भोकरदन, जि. जालना, हल्ली रा. कसलीवाल आपुर्वा अपार्टमेंट ऐअरपोर्ट समोर चिकलठाणा, औरंगाबाद), प्रफ्फुल नेमिचंद ताथेड (रा. वडगाव कोल्हारी, बजाजनगर, औरंगाबाद), पुरुषोत्तम बाबुराव उर्फ बापुराव कुरूमकर (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), विनायक उर्फ सचिन वामन चौधरी (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा), राजेंद्र भागुजी शेडगे (रा. 302 प्रथमेस अपार्टमेंट शिवने, ता. हवेली, जि. पुणे), रविंद्र श्रीराम जाधव (रा.बेगमपुरा, औरंगाबाद), महेमुदा बशिर शेख (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी), विलास उर्फ (आप्पा) भिवा निकत (रा. अंबिजळगाव, ता. कर्जत), वंदना राजेंद्र अल्हाट (रा. बोल्हेगाव, ता. नगर), अन्सार मुनीर शेख (रा. महादेववाडी, ता. श्रीगोंदा, हल्ली मुक्काम कोथिंबिरे मळा, साळणदेवी रोड श्रीगोंदा), बापु बलभिम निंभोरे उर्फ (मेजर) (रा. घोटवी, ता. श्रीगोंदा) यांनी कट करुन संगनमताने आपली शेतजमीन हडपली असल्याचे नमूद केले होते.

यामधील आरोपी क्रमांक 5 राजेंद्र भागुजी शेडगे (रा. 302, प्रथमेस अपार्टमेंट शिवने, ता. हवेली, जि. पुणे) हा दि. 30 डिसेंबर 2020 रोजी गुन्हा घडल्यापासून अद्दाप पावेतो फरार राहुन स्वतःचे अस्तित्व लपवत होता. दि. 7 जाने 2022 रोजी शेंडगे त्यांच्या राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीससूत्रांना मिळाली होती. सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे येथे जावुन उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या मदतीने मोठ्या शिताफिने आरोपीस ताब्यात घेत अटक केली.

सदर आरोपीस पोलीस कोठडी मिळाली असून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि एस एच गावीत, पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, गोवर्धन कदम यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई. भगवान शिरसाठ आणि रायटर पोलीस अंमलदार पोकॉ. ईश्वर माने, पोकॉ. अमित बरडे करीत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply