Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राज्यात पुन्हा दोन दिवस ढगाळ वातावरण

त्यानंतर दोन दिवस दाट धुकेही राहणार । हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज

अहमदनगर । वीरभूमी- Jan 21, 2022 • 10:03 AM 1945 views
शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 जानेवारी रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचे थेंब पडणार आहेत. त्यानंतर सोमवार दि. 24 व मंगळवार दि. 25 जानेवारी रोजी दाट धुके राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या संदेशात हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान मधील बहावलपूर येथे शुक्रवार दि. 21 जानेवारी रोजी चक्राकार स्थिती तयार होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरण राहुन पावसाचे थेंब येतील, असा अंदाज वर्तविला आहे.

मात्र पाकिस्तान, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, लडाख या राज्यात दि. 22, 23 व 24 जानेवारी रोजी खूप पाऊस पडणार आहे. तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे.

यामुळे राज्यात शनिवार दि. 22 जानेवारी व रविवार दि. 23 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, इगतपुरी, पालघर, पुणे, सांगली व इतर काही भागात पाऊस पडेल व काही भागात पावसाचे थेंब येत राहतील.

तर सोमवार दि. 24 जानेवारी व मंगळवार दि. 25 जानेवारी रोजी राज्यात दाट धुके राहणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply