Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वाळू तस्करीतून चापडगावात गोळीबार

भर सकाळी चौकातच केली दहशत । पोलिस घटनास्थळी दाखल

शेवगाव । वीरभूमी - Jan 22, 2022 • 11:35 AM 5949 views
शेवगाव आणि वाळू तस्करी यांचा संबध पुर्वापार सुरू आहे. या वाळू तस्करीतून अनेक वेळा मारामार्‍या, खून, जाळपोळ शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याने पाहिली आहे. याच वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोळीबाराने पोकॉ. दीपक कोलते हत्या प्रकरणाची आठवण झाल्या शिवाय राहात नाही.

शेवगाव तालुक्याच्या हद्दीवरून गोदावरी नदी वाहते. या नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा चोरीछुपा सुरू असतो. या वाळूच्या तस्करीतून अनेकवेळा दोन गटात मारामार्‍या, जाळपोळ व खुनासारख्या घटना घडल्याने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याने अनुभवल्या आहेत.

त्यातच आज शनिवारी सकाळी 10 वाजता चापडगाव येथे बाहेर गावाहुन दोन दुचाकीवर चौघे तरुण आले होते. भर चौकातच गावातील एका तरुणांवर यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

ही गोळी चापडगाव येथील तरुणाच्या हाताला चाटून गेली. तर त्या तरुणांनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने चापडगावसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाळू तस्करीने गुंडगिरी वाढल्याची बाब समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply