Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत जाहीर

आरक्षण सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले । बाळासाहेब वडजे, सौ सोनालीताई नाईकवाडी दावेदार

अकोले । वीरभूमी- Jan 27, 2022 • 05:59 PM 1689 views
आज गुरुवारी मंत्रालयात राज्यातील 135 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये नुकतीच निवडणूक पार पडलेल्या अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) निघाले आहे.

अकोले नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वडजे व सौ. सोनालीताई नाईकवाडी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

नुकतीच अकोले नगरपंचायतीची निवडणूक होऊन भाजपाने 12 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे भाजपाचीच सत्ता नगरपंचायत वर आली हे निश्चित झाले. मात्र एस. सी प्रभागात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्वेताली मिलिंद रुपवते (घोलप) या विजयी झाल्याने सर्वपक्षीयासह तालुक्याचे लक्ष नगराध्यक्ष पद आरक्षण सोडतीकडे लागले होते.

आज गुरूवारी दुपारी 4 वा मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील 135 नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. कोविड प्रादुर्भाव सुरु असल्याने या सोडतीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्तालयात आयोजित केले होते.

यावेळी चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) निघाले आहे. आता भाजपाचीच सत्ता असल्याने नगराध्यक्ष भाजपाचाच होणार हे निश्चित झाले असुन या पदासाठी भाजपामधुन बाळासाहेब वडजे किंवा भाजपच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मात्र आता माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड हे कोणाला पसंती देतात हे लवकर कळेलच. दोन्हीही उमेदवार कर्तुत्ववान आहेत. दोघेही अनुभवी आहेत. तसेच दोघेही दुसर्‍यांदा मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने अकोलकर दोघांनाही पसंदी देऊ शकतात.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply