Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

पारनेर नगर पंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

सर्वसाधारण पुरुष आरक्षण; राष्ट्रवादीचे विजय सदाशिव औटी प्रमुख दावेदार

पारनेर । वीरभूमी - Jan 27, 2022 • 07:01 PM 1066 views
राज्यातील १३५ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत आज गुरुवारी मंत्रालयात काढण्यात आली. यामध्ये पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष असे निघाले आहे.

तर नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठल्याने नगराध्यक्ष पदासाठी विजय सदाशिव औटी हे प्रमुख दावेदार झालेले आहेत.

पारनेर नगरपंचायतीसाठी झालेल्या सतरा जागेच्या निवडणुकीमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १० झालेले आहे.

या सदस्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने गट नोंदणी केल्यानंतर गटनेता म्हणून विजय सदाशिव औटी यांचे नाव दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ते प्रमुख दावेदार आहेत.

आज मुंबई येथे मंत्रालयात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये चिठ्ठीद्वारे नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष असे निघाल्याने आता राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

तरीही आमदार निलेश लंके हे कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply