Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोले नगराध्यक्षपदासाठी भाजपा, शिवसेनेकडून अर्ज दाखल

भाजपाकडून सोनालीताई नाईकवाडी तर शिवसेनेकडून नवनाथ शेटे यांचे अर्ज

अकोले । वीरभूमी - Feb 09, 2022 • 05:48 PM 1153 views
अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपाकडून सोनालीताई नाईकवाडी तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून नवनाथ शेटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. अकोले नगरपंचायतीत भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सोनाली नाईकवाडी या नगराध्यक्ष होणार असल्याचे चित्र आहे.

अकोले नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर आज नगराध्यक्ष निवडीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. सकाळी राष्ट्रवादी-सेना आघाडीचे वतीने शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून नगरसेवक आरीफ शेख तर अनुमोदक म्हणुन श्वेताली रुपवते यांच्या सह्या आहेत.

तर भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका सोनालीताई नाईकवाडी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन बाळासाहेब वडजे तर अनुमोदक म्हणुन हितेश कुंभार यांच्या सह्या आहेत.

सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी अर्ज स्वीकारले असुन 14 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 4 वा पर्यत माघारीची मुदत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपा कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, भाजपा सरचिटणीस नितीन दिनकर, भाजप युवा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांनी मुलाखती घेऊन नगराध्यक्षपदासाठी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांच्या नावाची घोषणा करुन सर्व 12 नगरसेवकांसह माजी आ. वैभवराव पिचड नगरपंचायत मध्ये जाऊन सोनालीताई नाईकवाडी यांचा अर्ज दाखल केला.

नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचे 12, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 2 व राष्ट्रीय काँग्रेस 1 असे संख्याबळ आहे. सर्वाधिक 12 नगरसेवक भाजपाचे असल्याने जवळपास नगराध्यक्षपदी सोनालीताई नाईकवाडी यांचे नाव निश्चित मानले जात आहे. अर्ज माघारी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत असुन माघारी झाली नाही तर विशेष सभा 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

यावेळी हातवर करुन मतदानाने निवड करण्यात येईल. तसेच उपनगराध्यक्षपदासाठीही याच दिवशी निवड करण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply