Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

पायी जाणार्‍या वृद्धाला भरधाव कारची धडक

वृद्धाचा मृत्यू । नगर-दौंड रस्ता बनला मृत्यूचा सापळा

श्रीगोंदा । वीरभूमी - Feb 09, 2022 • 09:23 PM 761 views
श्रीगोंदा तालुक्यातून जाणार्‍या अहमदनगर-दौंड महामार्गावरील काष्टी येथून सांगवी दुमालाकडे पायी जाणार्‍या वृद्धाला भरधाव कारने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये वृद्ध भगवान बाबू थोरात (वय 60 वर्षे, रा. सांगवी दुमाला) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार दि. 9 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

याबाबत विजय परसराम रणपिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात पांढर्‍या कार चालकांविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार फलके करत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून मनमाड-बेळगाव (राष्ट्रीय महामार्ग एन.एच. 160) या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम चालू असून 15 मीटर रुंदीच्या या रस्त्याला दुभाजक नाही. रिफ्लेक्टर व गतिरोधक असूनही कमकुवतपणामुळे ते प्रभावी ठरत नाहीत.

रस्त्याचे नविनीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 450 च्या पुढे निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. तर शेकडो नागरिक जायबंदी झाले आहेत. रस्ता झाल्यापासून विकास तर कोसो दूर राहिला आहे.

पण ठेकेदाराच्या अक्षम्य चुकीमुळे अनेक निरपराध नागरिकांचा बळी व असंख्य बालकांचे पालकत्व हरपले आहे. या सर्व गोष्टीला ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply