Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अकोलेत भाजपा नगरसेवकाचे पहिले जनसंपर्क कार्यालय

मात्री मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते आज उद्घाटन । प्रभागातील मतदारांच्या अडचणी सोडविणार

अकोले । वीरभूमी - Feb 09, 2022 • 10:48 PM 907 views
भाजपाच्या नगरसेवकांनी प्रभागातील मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय उभारावे, अशी सूचना भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आ. वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली होती.

त्याला प्रतिसाद देत प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शरद नवले यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्या गुरुवार दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे हस्ते व शिवाजीराजे धुमाळ यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन होत आहे.

अकोले शहरातील मतदारांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाला विश्वास दाखवून बहुमताने भाजपाचे 12 नगरसेवक निवडून दिले. यानंतर विजयी नगरसेवकांना मार्गदर्शन व सुचना करताना मा. आ. वैभवराव पिचड यांनी सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देताना मतदारांना संपर्कासाठी प्रभागात जनसंपर्क कार्यालय उभारावे असे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वात प्रथम प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शरदभाऊ नवले यांचे कार्यालयाचे उद्घाटन उद्या गुरूवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड यांचे हस्ते व जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांचे अध्यक्षतेखाली होत आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, आर. पी. आयचे नेते विजयराव वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले एज्युकेशन अध्यक्ष जे. डी. आंबरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, अ‍ॅड.वसंतराव मनकर, अ‍ॅड. बी. जे. वैद्य, चंद्रकांत सरोदे, मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

तरी या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक शरद नवले यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply