Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगाव शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

दोन्ही मुलींची सुटका । शेवगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी- Feb 16, 2022 • 01:29 PM 4836 views
रस्त्यावरुन जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी कार्तीक राजेंद्र काळे (वय 20, रा. आयशानगर, शेवगाव) याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही अपहरणाची घटना मंगळवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शेवगाव-नेवासा रोडवर घडली. या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनीच मुलीचे सुटका केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या महिलेच्या दोन मुली शेवगाव - नेवासा रस्त्याने आईकडे सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पायी चालल्या होत्या. दरम्यान कार्तिक राजेंद्र काळे (वय 20, रा. आयशानगर, शेवगाव) याने दोन्ही मुलींना आपल्या टेरेनो कार (क्र. एमएच 12, एमएफ 7700) मध्ये बसवून घेवून पळवून गेला.

दरम्यान हॉस्पिटलमध्ये गेलेली महिला घरी आल्यानंतर तीला आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. महिलेने पतीसह मुलींचा शोध घेतला असता मुली सापडल्या नाहीत.

दरम्यान सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण झालेल्या मुली लांडेवस्ती जवळ बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर डांबून ठेवल्याची माहिती अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी सदरील ठिकाणी जावून मुलींची सुटका करत आरोपी कार्तिक राजेंद्र काळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कार्तिक राजेंद्र काळे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या दोन्ही मुलींचे आरोपीने अपहरण कशासाठी केले याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक शेळके हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply