Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कर्जत नगरपंचायतीमध्ये महिलाराज

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उषा राऊत, उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले बिनविरोध

कर्जत । वीरभूमी- Feb 16, 2022 • 02:10 PM 736 views
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड संपन्न झाली असल्याची पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मुखाधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. कर्जत नगरपंचायतीमध्ये दोन्ही पदाधिकारी महिला देत आ रोहित पवारांनी महिलाराज निर्माण केले आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दि. 9 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सदरचा अर्ज वैध ठरला असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली होती. मात्र 16 रोजी नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड जाहीर होणार होती.

बुधवार, दि 16 रोजी सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी डॉ. थोरबोले यांनी लोकानियुक्त सर्व नगरसेवकांची बैठक घेत कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. यावेळी सर्व नुतन पदाधिकार्याची शहरात मिरवणूक काढत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात जात दर्शन घेतले.

कर्जतकरांच्या मनातील स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही उषा राऊत आणि रोहिणी घुले यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply