Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तहसील कार्यालयासमोर भाजपाचे धरणे आंदोलन

खा. सुजय विखे यांची उपस्थिती । मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

शेवगाव । वीरभूमी- Mar 04, 2022 • 02:25 PM 3775 views
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेवगाव-पाथर्डी भाजपाच्यावतीने खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी आघाडी सरकारवर टीका करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दाऊद इब्राहिम यांच्या संबध असल्याच्या आरोपावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना अटक केली असतांनाही आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातून मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले.

मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर ‘नवाब हटाओ, देश बचाओ’, दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाच्या दारातच धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांच्यावतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान खा. डॉ. सुजय विखे यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आघाडी सरकारवर टीका केली.

या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकिशोर शेळके,

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, सरचिटणीस भिमराज सागडेे, बजरंग घोडके, धनंजय बडे, गुरुनाथ माळवदे, कचरु चोथे, वाय. डी. कोल्हे, एकनाथ आटकर, संभाजी वाघ, दत्तात्रय बडे, अ‍ॅड. प्रतिक खेडकर, विजय कापरे, पृथ्वीराज पाथरे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply