Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांची निदर्शने

अकोले पंचायत समितीवर सीटूचे आंदोलन

अकोले । वीरभूमी- Mar 04, 2022 • 06:20 PM 1108 views
सिटू कामगार संघटना प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज अकोले पंचायत समिती येथे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी तीव्र निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचारी फेडरेशन मधील विविध संघटनांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आज राज्यभर निदर्शने करण्याची हाक दिली होती. यानुसार ही निदर्शने करण्यात आली.

अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. माकपच्या कार्यालयापासून मोर्चा काढून कर्मचार्‍यांनी अकोले पंचायत समिती वर धडक दिली. आपल्या विविध मागण्यांबाबत घोषणा देत यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी पंचायत समिती अकोले येथे तीव्र निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना केंद्रीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या. सदर मागणी मान्य होत नाही तोपर्यंत किमान 15 हजार रुपये मानधनवाढ तातडीने लागू करा. सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर पेन्शन द्या. सर्वांना अंगणवाडीच्या कामासाठी नवीन मोबाईल व मोबाईलमध्ये मराठी अ‍ॅप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या.

मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना पुर्ण अंगणवाडी कर्मचारी म्हणून दर्जा द्या. मदतनिसांना सेविकापदी बढती बाबत निकष शिथिल करा. पात्र सेविकांना सुपरवायझरपदी बढती द्या. अंगणवाडीची 2021 ची उन्हाळी सुट्टी मार्च पूर्वी जाहीर करा. सेवाज्येष्ठते प्रमाणे मानधनात वाढ लागू करा. दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करा.

अनेक अंगणवाडी ताईंचे गहाळ मानधन योग्य ती चौकशी करून तातडीने अदा करा. अंगणवाडी इमारतीची नवीन बांधणी व दुरूस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा. अंगणवाडी ताईंना आरोग्याच्या सोईसह संपूर्ण कुटुंबाला मोफत पाच लाखाचा आरोग्य विमा लागू करा. कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जनतेची सेवा करत असताना मृत झालेल्या अंगणवाडीताईंना 50 लाखांची विमा भरपाई तातडीने द्या.

थकीत प्रवास भत्ता, इंधन खर्च, अमृत आहार खर्च व थकीत बिल तसेच इतर देणे तातडीने अदा करा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. गणेश ताजणे, आशा घोलप, मंगल गोरे, निर्मला मांगे, रंजना पराड, रंजना साबळे, ताई म्हशाळ, रोशनी शिंगोटे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्ञानेश्वर काकड, किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले, सिटू कामगार संघटनेच्या वतीने सदाशिव साबळे व आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने संगीता साळवे यांनी मोर्चास पाठिंबा दिला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply