Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी पूर्ण ताकद देणार

मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर । शेवगाव येथे मनसे कार्यकर्त्यांची बैठक

शेवगाव । वीरभूमी- Mar 04, 2022 • 02:47 PM 1216 views
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार आहेत. निवडणुकीकरिता पदाधिकारी व उमेदवारांना पक्षाच्या वतीने पूर्ण ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केले.

शेवगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, सचिन डफळ, बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांच्या सुचनेनुसार हे तीनही जिल्हाध्यक्ष सध्या अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागात बैठकांचे आयोजन करण्यात आले असून येत्या 13 मार्च रोजी बाळा नांदगांवकर अहमदनगर येथे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याच्या व निवडणुकांची पूर्व तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मनसेचे जिल्हाअध्यक्ष देविदास खेडकर, सचिन डफळ, बाबासाहेब शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खेडकर बोलत होते.

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार आहेत. निवडणुकीकरीता पदाधिकारी व उमेदवारांना पक्षाच्या वतीने पूर्ण ताकद दिली जाणार आहे. तसेच पदाधिकारी व उमेदवारांना येणार्‍या अडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्या. याबाबतचा सविस्तर अहवाल ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व नेते बाळा नांदगांवकर यांना सादर करणार आहेत.

याप्रसंगी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, सरपंच दिलीप सुपारे, उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया, देविदास हुशार, शहर सचिव मंगेश लोंढे, विभागाध्यक्ष सुनिल काथवटे, उपाध्यक्ष संदीप देशमुख, बाळा वाघ, ग्रामपंचायत सदस्य गोरख कौंसे, अमिन सय्यद, अविनाश बुटे, नवनाथ भागवत, मच्छिंद्र तुजारे, अभिजीत तुजारे, अर्जुन तुजारे, संजय वेताळ, शिवनाथ आर्ले, साईनाथ बलीया, दत्ता बलीया, कुमार वीर, आनंद पवार, मच्छींद्र भडके यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहमदनगर येथे मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री आ.बाळा नांदगांवकर यांच्या मेळाव्यासाठी शेवगाव तालुक्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून अनेक कार्यकर्त्यांचा, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची माहीती मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply