Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दोन वर्षानंतर भटक्यांची पंढरी फुलणार

चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी मंदिरात मिळणार प्रवेश । प्रशासनाचा निर्णय

पाथर्डी । वीरभूमी - Mar 11, 2022 • 10:55 PM 1104 views
शासनाच्या निर्देशानुसार कोविडचे नियम पाळत श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी दोनशेच्या टप्पाने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय यात्रा नियोजन बैठकीत करण्यात आला. पारंपारिक व आवश्यक सर्व विधी साजरे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षानंतर भाविकांना थेट मंदिरात प्रवेश मिळणार असल्याने भटक्यांची पंढरी फुलणार आहे.

मढी देवस्थान समितीच्या महाप्रसाद गृहासमोर यात्रा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड होत्या. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गट विकास अधिकारी शीतल खिंडे, यासह परिवहन आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी,

देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, विश्वस्त शामराव मरकड, शिवजीत डोके, भऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, माजी सरपंच देवीदास मरकड, बाबासाहेब मरकड व ग्रामस्थ नवनाथ मरकड, डॉ रमाकांत मडकर, लक्ष्मण मरकड आदी उपस्थित होते.

मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत तीन टप्प्यांमध्ये होते. होळी, रंगपंचमी व अमावस्येला भरणारी फुलोरबाग यात्रा असे टप्पे असून रंगपंचमी टप्पा सर्वाधिक मोठा असतो. राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी भाविकांना दर्शन घेऊन लगेच माघारी फिरावे लागेल. रंगपंचमीच्या दिवशी मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लावून त्यानंतर त्यांची विधीवत पूजा केली जाते.

समाधी मंदिरासमोरील गर्दी टाळण्यासाठी अशा भाविकांना मंदिर परिसरात थांबण्यास बंदी असून यात्रेसाठी खास तयार करण्यात आलेल्या पटांगणात जाऊन पारंपारिक विधी करून माघारी फिरावे लागेल. अमावस्येच्या दिवशीची कावड यात्रा व निशान भेट मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होईल. गेल्या दोन वर्षापासून यात्रा बंद राहून यंदाही कोविडचे निर्बंध पाळून भाविकांना यात्रेस परवानगी मिळाल्याने भाविकांच्या उत्साहात भर पडली आहे.

यावेळी माहिती देताना आगार प्रमुख महेश कासार म्हणाले, एस टीचा संप मिटला नसला तरी जिल्ह्यातून एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण क्षमतेच्या सुमारे 25 टक्के बसेस आगारातून सुरू झाल्या आहेत. मढी येथून पैठणसाठी जादा गाड्या सुटतील.

यात्रेदरम्यान चालणारे अवैधधंदे, दारू विक्री पूर्णपणे बंद करावेत अशी मागणी अंबादास आरोळे यांनी केली.

यावेळी बोलताना अध्यक्ष संजय मरकड म्हणाले, यात्रेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या सर्व बाजूंनी सुमारे अडीचशे एकर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी हायमॅक्स, पथदिवे अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही.

मायंबा वरून येणारे भाविकाला थेटपणे पाथर्डी -तिसगाव येथे सहजपणे जाता येईल. देवस्थान समीतीच्या वतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर व भाविकांच्या संख्येसाठी निश्चित केलेली अट पाळुन दर्शन सोहळा संपेल.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply