Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुढीपाडव्याला जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुढीपाडव्याला जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

राहुरी । वीरभूमी- Mar 24, 2022 • 05:20 PM 812 views
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी शनिवार 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य मोठ्या गटास प्रथम पारितोषिक 11 हजार 111 रुपये बक्षीस माजी नगराध्यक्ष तथा नगर दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांच्याकडून तर द्वितीय 7 हजार रुपये मनसेचे राहुरी तालुका अध्यक्ष अनिल डोळस यांच्याकडून दिले जाणार आहे.

सामूहिक नृत्य लहान गटासाठी प्रथम बक्षीस 7 हजार रुपये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, द्वितीय 5 हजार रुपये देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांच्याकडून दिले जाणार आहे. मोठा गट सोलो नृत्य प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, द्वितीय 5 हजार रुपये आदेश मोबाईल शॉपी राहुरी फॅक्टरीचे सर्वेसर्वा सचिन बजरंग जाधव यांच्याकडून तर तृतीय बक्षीस 4 हजार रुपये जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोठुळे यांच्यावतीने दिले जाणार आहे.

सोलो नृत्य लहान गटासाठी प्रथम बक्षिस 5 हजार रुपये राहुरीचे माजी नगरसेवक तथा कृ.उ.बा.स.राहुरीचे संचालक नंदकुमार तनपुरे, द्वितीय 4 हजार रुपये आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम तर तृतीय 3 हजार रुपये युवा उद्योजक अविनाश मुसमाडे यांच्यावतीने दिले जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी 7709037750, 9665919933 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply