Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अगामी निवडणुकांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा

प्रा. किसन चव्हाण । वंचितच्या शेवगाव तालुका कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार

शेवगाव । वीरभूमी - Mar 24, 2022 • 10:14 AM 688 views
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंग्यांची भूमिका घेऊन सत्तेच्या खुर्चीवर वर्षानुवर्षापासून बसलेल्या भूजंगांना अलगदपणे बाजूला सारून सत्ता परिपर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील ममता लॉन मध्ये आयोजित तालुका कार्यकारिणीच्या नव नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार व अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित पूर्व तयारीच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात घोंगडी बैठकांचे आयोजन करून गावातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या प्रश्नावर चर्चा करून त्या सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे करायचे आहे.

लोकांच्या प्रश्नावर वाडी, वस्ती, चावडी, मंदिर व पारावर जाऊन चर्चा करायची. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रमुख भूमिका बजवायला हवी. आपल्या कामामुळेच आपली स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण होणार आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावातील छोट्या जाती समूहाचे किमान 10 लोक एकत्र करून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना घेऊन गावात घरोघरी जा, गावातील प्रश्न व कार्यकर्त्यांची नोंद घ्या. बैठका घ्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम करा. आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असा नारा त्यांनी दिला.

यावेळी संतोष ढाकणे, राजू उगलमुगले, संजय मातंग, अजिनाथ आव्हाड, सुनिता जाधव यांची भाषणे झाली. प्यारेलाल शेख यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र निळ यांनी सूत्रसंचालन केले. गणेश भिसे यांनी आभार मानले.

या बैठकीत अध्यक्ष प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, विशाल इंगळे, सोपानराव काळे, किसनराव पवार, आदिनाथ आव्हाड, विष्णू वीर, विठ्ठल मगर, दिगंबर बल्लाळ, महादेव तुतारे, दगडू गोरुडे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर म्हस्के, शफीक शेख, पंढरीनाथ कोल्हे, भरत मिसळ, नितीन जाधव, संजय कुर्‍हाडे, अशोक शिंदे, बाबुराव फुळमाळी, अशोक दिंडे, बबलू दळवी, कैलास चोरमले, ज्ञानेश्वर गिरी, डॉ. अंकुश गायकवाड, दादासाहेब गायके, रवींद्र सर्जे, विश्वास गावडे,

लक्ष्मण ससाणे, गोरख तुपविहिरे, निखिल ससाणे, नामदेव काळे, दिलीप कवडे, रंगनाथ मातंग, महादेव शिंदे, राजेंद्र उगलमुगले, प्रसिध्दी प्रमुख शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply