Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

लाच मागणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला अटक

यापुर्वी 2017 साली लाच घेतांना पकडले होते

विजय उंडे । वीरभूमी- Mar 23, 2022 • 05:13 PM 3179 views
श्रीगोंदा ः दाखल असलेल्या किरकोळ गुन्ह्यात अटक न करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील अंमलदाराने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेला पोलिस अंमलदाराचे नाव संजय बबन काळे असे आहे. या कर्मचार्‍याला 2017 मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीस असतांना लाच घेतांना पकडले होते. या घटनेने श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या किरकोळ गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाची अटक टाळण्यासाठी व आरोपीच्या बाजूने मदत करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अंमलदार संजय बबन काळे (वय 32 वर्षे) याने दि. 10 मार्च 2022 रोजी तक्रारदारास 20 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तडजोड होऊन 17 हजार रुपये लाचेची मागणी स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आज आरोपी संजय काळे याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आरोपी पोलिस अंमलदार संजय काळे हा 2017 साली तोफखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीस असतांना लाच घेतांना रंगेहात पकडला होता. आता पुन्हा तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पो. नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पो. अंमलदार वैभव पांढरे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply