Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कारखाना प्रशासनाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांची मागणी । जोहरापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण

शेवगाव । वीरभूमी - Apr 12, 2022 • 11:35 PM 877 views
उसाला वेळीच तोड मिळाली नाही म्हणून शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी कै.जनार्दन माने यांनी शेतातील उभा ऊस पेटवून देत विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी सर्वस्वी कारखाना प्रशासन कारणीभूत असून याप्रकरणी तातडीने कारखाना प्रशासना विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कारखान्याच्या वतीने पिडीत कुंटुबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.

आज जोहरापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कै.जनार्दन माने यांच्या निवास्थानी जाऊन मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी भेट देत परिस्थितीची माहीती घेतली. तालुक्यातील अनेक साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून स्थानिक शेतकर्‍यांवर अन्यान्य करत आहेत. स्थानिक शेतकर्‍यांना उस तोडीसाठी टोळ्या दिल्या जात नाहीत.

हा अन्याय राजरोसपणे सुरू असून या विंवचनेतूनच माने यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. यास सर्वस्वी कारखाना प्रशासन जबाबदार असून कारखाना प्रशासना विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहीजे, अशी मागणी यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.

येत्या तीन-चार दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ साखर आयुक्तांची भेट घेऊन सदर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, उपतालुकाध्यक्ष संजय वणवे, सोमनाथ आधाट, विकास भागवत, गणेश डोमकावळे, नवनाथ भागवत, रामेश्वर बलिया, ज्ञानेश्वर कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फंटागरे आदी जण उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply