Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जोहरापूर येथील शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल

अगोदर ऊस पेटवला नंतर विषारी औषध घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

शेवगाव । वीरभूमी - Apr 07, 2022 • 12:39 AM 3862 views
मोठ्या कष्टाने व मेहनतीने शेतात लावलेल्या ऊसाचे पिक जोमात आले होते. मात्र त्या ऊसाला कारखान्याकडून तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने ऊस पेटवून देऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे घडली आहे.

जनार्दन सीताराम माने (वय 70) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत शेवगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी जनार्दन सीताराम माने (वय 70) यांनी मोठ्या कष्टाने तीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली होती. त्या ऊसाची तोडणीची तारीख टळून गेली होती. सध्या अतिरीक्त ऊसाचे उत्पादन झाल्याने तोडणी मिळणे दुरापास्त झाले होते.

त्यातच मंगळवारी दुपारी जनार्दन माने यांनी स्वतःच्या हाताने शेतातील उभ्या ऊसाच्या पिकाला आग लावून दिली. त्यानंतर त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी औषध घेतल्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आली असून पोलिस चौकशी करण्यात येत आहे.

यावर्षी ऊसाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या ऊसाला तोड मिळत नाही. त्यातच जनार्दन माने या शेतकर्‍याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply