Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओचा अपघात

इंदोरीकर महाराज यांच्या स्कार्पिओचा अपघात

अहमदनगर । वीरभूमी - Apr 14, 2022 • 10:23 AM 5592 views
प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या गाडीला बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास परतूर येथे अपघात झाला. या अपघातात गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

निवृत्ती महाराज इंदोरीकर हे काल बुधवारी जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथे किर्तनसाठी जातांना हा अपघात झाला. सुदैवाने इंदोरीकर महाराज यांना कुठलीही ईजा झाली नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवार दि. 13 रोजी इंदोरीकर महाराज कीर्तनसेवेसाठी जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथे स्कर्पिओने (क्र. एमएच 12, टीवाय 1744) चालले होते. दरम्यान रात्री 8.30 वाजेच्या सुमारास परतूर येथील एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओची लाकडाची वाहतूक करणार्‍या ट्रक्टरला धडक बसली.

या अपघातात स्कार्पिओ चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला तर इंदोरीकर महाराज यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. जखमी चालकाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती कळताच पोनि. शामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply