Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

भगवानराव पाचपुते यांच्या 41 वर्षाच्या सत्तेला सुरुंग

सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेवर नागवडे गटाच्या कैलासराव पाचपुते यांचे वर्चस्व

श्रीगोंदा । वीरभूमी - Apr 22, 2022 • 10:41 PM 2212 views
श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्‍या सहकारात आशिया खंडात अग्रेसर असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया 2022-2027 पर्यंतसाठी निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होवून अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या या निवडणूकीत राजेंद्र नागवडे गटाचे ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पॅनलने बाजी मारुन सर्वच्या सर्व जागा जिंकून इतिहास घडविला आहे.

संस्थेत कायम 41 वर्षे सत्ता भोगणार्‍या भगवानराव पाचपुते यांची एकहाती सत्ता उलथवत मतदारांनी ऐतिहासिक बदल घडवून आणला असल्याने काष्टी गावात एकच जल्लोश झाला आहे.

शेकडो कोटींची वार्षिक उलाढाल असणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेची निवडणूक शुक्रवार दि. 22 रोजी पार पडली यामध्ये 677 मतदाना पैकी एकूण 674 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी चार वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरु होवून दिड तासात मतमोजणी पूर्ण होवून यामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते कैलासराव शिवराम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी संस्थेत परिवर्तन करत इतिहास घडविला आहे.

भैरवनाथ महाराज सहकार परिवर्तन पनलचे विजयी उमेदवार राकेश कैलास पाचपुते, सुभाष साहेबराव पाचपुते, लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते, शहाजी शिवाजी भोसले, सर्जेराव दत्तात्रय पाचपुते, विठ्ठलराव जगन्नाथ काकडे, बाळासाहेब संभुदेव पाचपुते, रोहिदास पंढरीनाथ सोनवणे, प्रा. सुनिल काळूराम माने, अलका संजय नलगे, सुवर्णा मनोहर दांगट, दादासाहेब बाबुराव कोकाटे, काशिनाथ अप्पासाहेब काळे या उमेदवारांनी 35 ते 70 मताच्या फरकाने परिवर्तन घडून आणले आहे.

या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत दोन्ही पार्टीने चांगलेच वातावरण तापविले होते. होणारी निवडणूक ही सत्ताधारी गटाच्या अस्तित्वाची तर विरोधी गटाने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये विरोधी राजेंद्र नागवडे गटाने बाजी मारुन परिवर्तन घडविले आहे.

या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाचे भगवानराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली गेली 41 वर्षे संस्थेवर एकहाती सत्ता होती. ती आता परिवर्तन होवून संपुष्टात आल्याने भगवानराव पाचपुते यांना मोठा राजकीय धक्का आहे.

या निवडणुकीत ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांचा मुलगा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाचपुते, माजी अध्यक्ष भास्करराव जगताप, संचालक लक्ष्मीकांत राम पाचपुते व आदीकराव चव्हाण या प्रमुख उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply