Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणुन सेवानिवृत्त विस्तार अधिकार्‍याची हत्या

शेवगाव तालुका हत्येच्या घटनेने हादरला । गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

शेवगाव । वीरभूमी- May 04, 2022 • 11:19 PM 9586 views
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन डोक्यात लाकूड व कुर्‍हाड सदृश्य धारदार हत्याराने वार करुन सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिवनाथ नारायण साबळे (वय 60) यांची हत्या करण्यात आली. ही घटना शेवगाव तालुक्यातील भगूर येथे बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शिवनाथ नारायण साबळे (वय 60) हे शेवगाव पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त होवून आपल्या मूळगावी भगुर (ता. शेवगाव) येथे गावामध्ये राहात होते.

मयत साबळे यांच्या शेताशेजारीच शेती असलेल्या एकाने बुधवार दि. 4 रोजी ते शेतामध्ये कामानिमीत्त गेले होते. तेथे एकाजणाने मयत साबळे यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र मयत साबळे यांनी पैसे न दिल्याने आरोपीने साबळे यांच्या डोक्यामध्ये लाकुड व कुर्‍हाड सदृश्य धारदार हत्याराने वार करुन जबर मारहाण केली.

या मारहाणीमध्ये शिवनाथ साबळे हे जबर जखमी झाले. त्यांना शेजारील नातेवाईत व कुटूबियांनी शेवगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेवून मारहाण करणार्‍या एकाला ताब्यात घेतले आहे. मयत साबळे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकऱणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

दरम्यान शेवगाव शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याने व याकडे पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याने गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply