Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

चित्रकार खराटे यांच्या ‘मूर्त-अमूर्त’ चित्रांचे प्रदर्शन

मंंळवारपासून मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार प्रदर्शन

अकोले । वीरभूमी- May 29, 2022 • 06:45 PM 1953 views
अकोले येथील प्रसिद्ध चित्रकार मिनानाथ खराटे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये भरत आहे. अकोल्यातील कला शिक्षकाचे प्रदर्शन प्रथमच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे.अकोल्याचे भूमिपुत्र असणारे मुंबई स्थित प्रसिद्ध चित्रकार सुरेश आवारी यांच्या चित्रांचे प्रदर्शन या पूर्वी तेथे झाले आहे. विशेष म्हणजे याच श्री. आवारी तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप यांचे हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

31 मे ते 6 जून या कालावधीत भरणार्‍या ‘मूर्त-अमूर्त’ या प्रदर्शनात श्री. खराटे यांची मूर्त स्वरूपातील चित्रे तसेच त्यांचे मित्र जितेंद्र सोनवणे यांनी अमूर्त स्वरूपातील चित्रे आणि पंकज गडाख यांच्या शिल्पाकृती यांचा समावेश आहे.

श्री. खराटे यांनी काढलेली अकोले शहरातील जुने वाडे, गल्ल्या विशेषतः येथील चिरेबंदी परिसरातील जुन्या वास्तू, तसेच भंडारदरा परिसरातील अभिजात निसर्ग यांची चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येत आहेत. आपल्या जुन्या वास्तूंमध्ये वास्तुकलेच्या दृष्टीने सौंदर्य असते. आता काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या या वस्तूंच्या स्मृती या चित्राद्वारे त्यांनी जपल्या आहेत.

आपण ज्या भोवताल रहातो त्याचे परिणाम, संस्कार आपल्यावर होत असतात. ते मांडण्याचा प्रयत्न आपण केला. कलाकार म्हणून जे भावलं ते चित्र बद्ध केले असल्याचे श्री. खराटे यांनी सांगितले.

श्री. खराटे येथील मॉडर्न हायस्कूल मध्ये कला शिक्षक म्हणून काम करतात. कलनिकेतन नाशिक आणि जे. जे. स्कूल, मुंबई येथे त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. येथील अगस्ती आश्रमात अगस्ती ऋषींच्या जीवनावर त्यांनी काढलेली चित्रे भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहेत. संगमनेरचे प्रांत कार्यालाय, अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिक महसूल आयुक्त कार्यालय येथेही त्यांची चित्रे लावलेली आहेत. देशाच्या विविध भागाबरोबरच परदेशातही त्यांची चित्रे पोहचली आहेत.

प्रवरेच्या काठावरील कुंबेफळ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा जुन्या पिढीतील शिल्पकार होते. आजोबांनी घडविलेल्या मूर्ती, प्रवरेचा खळाल, अकोल्याचा निसर्ग आणि सभोवतालचे ग्रामीण जीवन पहात ते लहानाचे मोठे झाले. हे सर्व त्यांच्या चित्रांचे विषय आहेत.

या पूर्वी त्यांनी अनेक चित्र प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. पण मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आपले चित्र प्रदर्शन भरावे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अकोल्याच्या एका कलाकाराचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply