Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2022 • 06:11 PM 5172 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. संगमनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.

प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात आता 10 जिल्हा परिषद गट व 20 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) समनापूर गट- (समनापूर गण)- समनापूर, सुकेवाडी, कुरण, पोखरी हवेली, खांजापूर, मालदाड. (निमोण गण)- पारेगाव बु., पळसखेडे, पिंपळे, कर्‍हे, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, सोनोशी, निमोण, नान्नज दुमाला,

2) तळेगाव गट (तळेगाव गण)- तळेगाव (आरामपूर, अजमपूर, जुनेगाव, हसनाबाद, शिवापूर), चिंचोली गुरव, कासारे, लोहारे, देवकौठे, वडझरी बुद्रुक, काकडवाडी, वडझरी खुर्द, तिगाव. (कोकणगाव गण)- कोकणगाव, मनोली, कौठे कमळेश्वर, निळवंडे, कोंची, करुले, मिरपूर, मेंढवण.

3) आश्वी बु. गट (आश्वी बु. गण)- आश्वी बु., निमगाव जाळी, चिंचपूर बु. (चिंचपूर खुर्द), उंबरी (बाळापूर), सादतपूर, औरंगपूर. (आश्वी खुर्द गण)- आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपूर, खळी, दाढ खुर्द, चणेगाव, झरेकाठी, प्रतापपूर.

4) जोर्वे गट (जोर्वे गण)- जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहिमपूर, जाखुरी, खराडी, ओझर खुर्द, कनकापूर. (अंभोरे गण)- पानोडी, शिबलापूर, कोळवाडे, शेडगाव, मालुंजे, ओझर बु., हंगेवाडी, अंभोरे.

5) संगमनेर खुर्द गट (संगमनेर खुर्द गण)- संगमनेर खुर्द (वैदुवाडी), निमज, हिवरगाव पावसा, खांडगाव, झोळे. (वडगाव पान गण)- वडगाव पान, कोल्हेवाडी, रायतेवाडी, देवगाव, रायते, वाघापूर, माळेगाव हवेली, निंभाळे, निमगाव टेंभी, शिरापूर.

6) घुलेवाडी गट (घुलेवाडी गण)- घुलेवाडी. (गुंजाळवाडी गण)- गुंजाळवाडी (ढोलेवाडी), वेल्हाळे, सायखिंडी. 7) धांदरफळ बु. गट (धांदरफळ बु. गण)- धांदरफळ बु., वडगाव लांडगा, चिखली, पिंपळगाव कोंझिरा, मंगळापूर, कौठे धांदरफळ, सांगवी. (राजापूर गण)- राजापूर, जवळे कडलग, कासारा दुमाला, चिकणी, निमगाव भोजापूर.

8) चंदनापुरी गट (चंदनापुरी गण)- चंदनापुरी (गाभणवाडी), पिंपळगाव देपा (खंडेरायवाडी, मोधळवाडी), सावरगाव तळ, डोळासणे (बांबळेवाडी), पोखरी बाळेश्वर, कर्जुले खुर्द (गुंजाळवाडी पठार), पिंपळगाव माथा, शिरसगाव (धुपे). (पेमगिरी गण)- पेमगिरी, मिर्झापूर, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, नांदुरी दुमाला, धांदरफळ खुर्द (गोडसेवाडी), सावरचोळ (मेंगाळवाडी),

9) साकुर गट (साकुर गण)- साकुर, जांभूळवाडी, नांदुर खंदरमाळ, जांबुत बु. (जांबुत खुर्द), हिवगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी. (वरवंडी गण)- शिंदोडी, खरशिंदे (कणसेवाडी), रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, वरवंडी (कुंभारवाडी, चौधरवाडी), मांडवे बु., खांबे, डिग्रस.

10) बोटा गट (बोटा गण)- बोटा (मावळवाडी, केळेवाडी), अकलापूर (आभाळवाडी, शेळकेवाडी, येलखोपवाडी), घारगाव, आंबी दुमाला, भोजदरी (पेमरेवाडी), कुरकुटवाडी, म्हसवंडी, कुरकुंडी. (खंदरमाळवाडी गण)- जवळे बाळेश्वर (कौठेवाडी), सावरगाव घुले, वनकुटे, कौठे खुर्द (खांडगेदरा), वरुडी पठार, खंदरमाळवाडी, आंबी खालसा, कौठे बु., सारोळे पठार, माळेगाव पठार, बोरबनवाडी, महालवाडी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply