Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

7 जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2022 • 07:17 PM 5772 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.

प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात आता 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) पिंपळगाव पिसा गट (पिंपळगाव पिसा गण)- पिंपळगाव पिसा, विसापूर, कोंडेगव्हाण, निंबवी, कोरेगव्हाण, चांभुर्डी, अरणगाव दुमाला, सारोळा सोमवंशी. (देवदैठण गण)- देवदैठण, राजापूर (दाणेवाडी, मेंगालवाडी), ढवळगाव, हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, येवती.

2) कोळगाव गट (कोळगाव गण)- कोळगाव (पांढरेवाडी, लगडवाडी, वेठेकरवाडी, भापकरवाडी), चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, उखलगाव, मुंगुसगाव. (घारगाव गण)- घारगाव, कोथूळ, पारगाव सुद्रिक (खेतमाळीसवाडी), घोटवी, वडाळी, सुरोडी, बेलवंडी कोठार.

3) मांडवगण गट (मांडवगण गण)- मांडवगण, महांडुळवाडी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी, घोगरगाव, कामटी (वडघुल), बनपिंप्री. (भानगाव गण)- भानगाव, रुईखेल, बांगार्डे, ढोरजे, पिसोरेखांड, खांडगाव, टाकळीलोणार, कोसेगव्हाण (महादेववाडी).

4) आढळगाव गट (आढळगाव गण)- आढळगाव (गव्हाणेवाडी, डोकेवाडी), तांदळी दुमाला, देऊळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, घुगलवडगाव. (पेडगाव गण)- पेडगाव, चांडगाव, हिरडगाव, टाकळी कडेवळीत, शेडगाव, चोराचीवाडी, (भिंगाणदुमाला, भिंगाणखालसा), अधोरेवाडी.

5) बेलवंडी बु. गट- (येळपणे गण)- येळपणे (पोलिसवाडी, पिसोरे बु.), म्हसे (वडगावशिंदोडी), माठ, उक्कडगाव, एंरडोली, पिंप्री कोलदंर, रायगव्हाण. (बेलवंडी बुद्रुक गण)- बेलवंडी बु., लोणीव्यंकनाथ (महादेववाडी, पार्वतवाडी), बाबुर्डी.

6) लिंपणगाव गट (हंगेवाडी गण)- हंगेवाडी, बोरी, वांगदरी, (मासाळवाडी, चोरमलेवाडी, डोमाळेवाडी, ढोकराईमाळ), शिरसगाव बोडखा, चिंभळे. (लिंपणगाव गण)- लिंपणगाव (जंगलेवाडी, मुंढेकरवाडी, जोशीवस्ती), म्हातारपिंप्री, मढेवडगाव.

7) काष्टी गट (काष्टी गण)- काष्टी, सांगवी दुमाला, निमगाव खलू. (अजनूज गण)- अजनूज, आर्वी (अनगरे), वेळू, चिखलठाणवाडी (कणसेवाडी), आनंदवाडी, कौठा (शिपलकरवाडी), गार.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply