Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कार-ट्रकच्या अपघातात एक ठार, पाच जखमी

नगर-दौंड रस्त्यावर घडला अपघात

श्रीगोंदा । वीरभूमी - Jun 06, 2022 • 12:00 PM 1022 views
नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव शिवारात रविवार दि. 5 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत कारमधील भास्कर तोरडे (रा. रायरा, ता. घनसांगवी, जि. जालना) हे जागीच ठार झाले असून तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर दौंडकडून नगरच्या दिशेने कोळगाव शिवारात पहाटे चार वाजेच्या सुमारास जाणार्‍या कारची (एम.एच.12, ए.जे. 9327) भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने समोरून जोराची धडक दिली.

या जोरदार टक्करीमुळे चालकाशेजारी बसलेले भास्कर तोरडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. कारमधील इतर पाचजण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. धडकेचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढत नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीमध्ये पोलीस पती- पत्नीचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


नगर - दौंड काँक्रिट रस्त्यावर चार वर्षात 400 च्यावर बळी
2017 पासून मनमाड - बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील नगर- दौंड या रस्त्याचे आत्तापर्यंत जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून अजूनही काही ठिकाणी अपूर्ण काम राहिले आहे. गेल्या चार वर्षांत आत्तापर्यंत 400 च्यावर बळी गेले असून शेकडो नागरिक जायबंदी झाले आहेत. दुभाजक नसल्यामुळे व चकाचक काँक्रिट रस्त्यामुळे चालकांना वेगाचा मोह आवरत नाही. जवळपास रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेग नियंत्रणासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने अपघातांची सरासरी वाढल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वेळीच प्रशासन व ठेकेदाराने दखल घेतली नाही तर अपघातांची मालिका खंडीत होणार नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply