Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेस प्रवक्ते पदाचा राजीनामा

या कारणाने दिला आपल्या पदाचा राजीनामा

अकोले । वीरभूमी- Jun 07, 2022 • 11:39 AM 960 views
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या नव संकल्प शिबिरात ‘एक व्यक्त एक पद’ हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार काँग्रेस पक्षात काम करतांना ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पदे आहेत त्यांना एक पद वगळून इतर पदे सोडावी लागणार आहेत.

उत्कर्षा रुपवते यांचेकडे काँग्रेस कमिटीचे महासचिव व प्रवक्ते अशी दोन पदे आहेत. उदयपूर येथील ठरावानुसार यांनी आपल्या काँग्रेस प्रवक्ते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे राजीनामा सुपूर्त केला आहे.

राजीनामा दिल्यानंतर उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, पक्षाच्या उदयपूर येथील नव संकल्प शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आपला पक्षाच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव म्हणून पक्ष संघटनेसाठी मी कटिबद्ध होते व यापुढेही सदैव राहील, असे राजीनामा पत्रात उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply