Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

काळजी घेण्याचे आवाहन । दहा दिवसात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या सात पटीने वाढली

अहमदनगर । वीरभूमी - Jun 15, 2022 • 01:50 PM 3037 views
देशासह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाची चौथी लाट आल्याचे आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्याही कासव गतीने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी हळू हळू वाढत होती. आज बुधवार दि. 15 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात 14 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होवू लागली आहे.

दि. 5 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या 7 एवढी होती. त्यामध्ये हळूहळू वाढ होत मंगळवार दि. 14 जून पर्यंत ती 42 एवढी झाली. त्यातच आज तब्बल 14 कोरोना बाधितांची भर पडणार असल्याने हा उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 50 च्या पुढे जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त होत असून जिल्ह्यातही चौथी लाट येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात बुधवार दि. 15 जून रोजी श्रीरामपूर 5, नगर शहर 2, नगर ग्रामीण 2, नेवासा 2, इतर जिल्हा 1, राहुरी 1, शेवगाव 1 असे 14 कोरोना बाधित आढळले आहेत. तर मंगळवार दि. 14 जून रोजी जिल्ह्यात 5 कोरोना बाधित आढळले होते. यामुळे मंगळवार पर्यंत उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधिताची संख्या 42 वर पोहोचली होती. यामध्ये आजच्या आकडेवारीची भर पडणार आहे. मात्र कोरोना मृत्यूचा आकडा हा शुन्यावर असल्याने दिलासा मिळत आहे.

तरी नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्यासह प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. तसेच इतर प्रतिबंधक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply