Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

‘अगस्ति’ची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवावी

माजी मंत्री मधुकरराव पिचड । भाग्यलक्ष्मी टिकणे आवश्यक

अकोले । वीरभूमी- Jun 14, 2022 • 04:48 PM 1477 views
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. तरी ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, कारखान्याचे सभासद यांना आवाहन करीत असून तालुक्याची ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे. याकरीता आपण यापुर्वीपासून जी सर्वांना बरोबर घेत निवडणूक बिनविरोधची प्रथा पाडली आहे. तीच पुढे नेण्याची आपली भूमिका असल्याचे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व अगस्ति कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी जाहीर केली आहे.

श्री. पिचड यांनी अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केल्याचा आपल्याला आनंद आहे. निर्मितीचा जो आनंद असतो तो कशातच नाही. कारखान्याने मात्र तालुक्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला नेहमीच जादा भाव देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. किंबहूना एफआरपी पेक्षाही जास्त भाव दिला. साखरे बरोबरच इतर उपपदार्थ निर्मितीसाठी इथेनॉल प्रकल्प उभारला.

हा कारखाना टिकावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो. दरम्यानच्या काळात कारखाना बंद पडला. या काळात कामगार व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान तर झालेच पण जे नुकसान झाले, त्यामुळे आपण खूपच मागे गेलो. बंद पडलेला कारखाना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपण चालू केला. तेव्हा आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संचालक मंडळात प्रतिनिधीत्व देत एक नवी प्रथा पाडली.

आज राज्यात देशात अनेक कारखाने फक्त नावाला सहकारी आहेत पण प्रत्यक्षात ते काहींच्या मालकीचे आहेत हे मी सांगायला नको. अत्यंत लोकशाही मार्गाने आपण कारखाना चालविला. अगस्ति हा खर्‍या अर्थाने सभासदांच्या मालकीचा आहे. हा सभासदांच्याच मालकीचा रहावा हीच आपली प्रामाणिक भूमिका आहे. कारखान्यात आपण कधी राजकारण आणले नाही, त्याकडे कधी आपण राजकीय दृष्टीकोनातून पाहिले नाही.

जेव्हा केव्हा अगस्ति कारखाना अडचणीत आला तेव्हा तेव्हा आपण त्यातून सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढला. अगस्ति कारखाना ही खर्या अर्थाने भाग्यलक्ष्मी आहे. तीच्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. अनेकांच्या चूली पेटतात आज तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकणार्‍या ऊसाला त्यामुळे जागेवरच बाजारपेठ निर्माण झाली. कारखान्याच्या निर्मितीमागचा आपला उद्देशच हा होता की, शेतकर्‍यांचे हाल होऊ नये. तोच अगस्ति आजपर्यंत आपण चालविला यापुढे देखील सर्वांच्या मदतीने तो आत्मविश्वासाने चालवू यात तिळमात्र शंका नाही.

राजकीय संघर्ष जेव्हा जेव्हा होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम कारखान्यावर संस्थेवर होतात हे आपण यापुर्वी पाहिले. तेव्हा कारखान्याकडे राजकारण म्हणून न पाहता त्याकडे एक भाग्यलक्ष्मी म्हणून सर्वांनी पहावे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, आपण याबाबत नेहमीच कारखान्याच्या वार्षिक सभांमधुनही ही भूमिका जाहीर केली असून आजही आपली तीच भूमिका आहे.

राजकारणाच्या पातळीवर जरुर करु पण कारखान्यात करणार नाही. अगस्तिची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी यापुर्वी जसे आपण एकत्र आलो, बैठका घेतल्या. तसे एकत्र बसू आणि सर्वसमावेशक संचालक मंडळ देऊ, अगदी माघारीपर्यंत आपली कुणाशीही चर्चा करण्याची भूमिका आहे.

अगस्ति कारखाना ही तालुक्याची शिखर संस्था असून तीचे हित जोपासण्यासाठी आपली एक पाऊल मागे येण्याची देखील तयारी असून कारखान्याचे सभासद कर्मचारी यांचे हित आपल्याला महत्वाचे वाटते. ते जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन श्री. पिचड यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply