Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्यात तीघे जबर जखमी

पाथर्डी शहरालगतची घटना । जखमींवर नगर येथे उपचार सुरु

पाथर्डी । वीरभूमी- Sep 30, 2022 • 03:20 PM 3551 views
पाथर्डी शहरातील जुन्या नगर रस्त्यावरील (खेर्डे पानंद) बोरूडे वस्ती येथील देविदास नामदेव बोरूडे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोराकडून चोरीच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला करण्यात आला. बोरुडे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी संदीप नामदेव बोरूडे, देविदास नामदेव बोरूडे, त्यांची वयोवृद्ध आई पार्वती नामदेव बोरुडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जबर जखमी करत मोठा ऐवज पळविला, असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीतील गंभीर जखमींना उपचारासाठी प्रथम पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मध्यरात्री अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. अचानक झालेल्या दरोडेखोरांच्या हल्ल्यामुळे पाथर्डी शहराचा संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

हा हल्ला झाल्यानंतर बोरुडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे लक्ष्मण बोरुडे, अक्षय बोरुडे, महेश वायकर, उमेश साखरे, रमेश साखरे, पोपट साखरे, सचिन साखरे व परिसरातील इतर घटनास्थळाकडे धावून आले. यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. याबाबत हल्ल्यातील जखमी नगरला उपचार घेत असल्याने अजून गुन्हा दाखल झालेला नव्हता.

पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेत जलद गतीने तपास करून दरोडेखोरांना अटक करावी. येथील वस्त्यांना पोलीस संरक्षण देऊन रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. असा गंभीर प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply