Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अष्टमीनिमित्त मोहटादेवी गडावर होमहवन, कुमारीका पुजन

प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

पाथर्डी । वीरभूमी - Oct 04, 2022 • 09:03 AM 1035 views
श्रीक्षेत्र मोहटादेवी येथे शारदीय नवरात्रात्सवा दरम्यान आज अष्टमी निमित्त गडावर होम हवन, कुमारीका पुजन, सुवासिनींची ओटी भरणे आदी कार्यक्रम संपन्न झाले. देवस्थान समितीच्या पुरोहितांसह आळंदी, बीड येथील पुरोहितांनी पौरोहित्य केले.

प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लागड्डा व सौ. मालती यार्लागड्डा तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व सौ. गीता गोसावी यांचे हस्ते होमहवन पूजा संपन्न झाली.

गेल्या आठ दिवस राज्याच्या विविध भागातून सुमारे 15 लाख भाविकांनी देवस्थानला भेट दिली. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणखी किमान पाच लाख भाविक भेट देतील, असा अंदाज देवस्थान समितीचा आहे. बीड, गेवराई, पुणे, औरंगाबाद, पारनेर येथून विविध उद्योजक राजकीय नेते आदींनी भाविकांना मोफत देवी दर्शन घडविले.

आज पुणे येथील एका नगरसेवकाने त्यांच्या विभागातील अडीचशे लग्जरी बसेस भरून भाविकांना दर्शन घडविले. आमदार निलेश लंके यांनी सात दिवस एक हजाराहून अधिक बसेस द्वारे भाविकांना मोहटा देवीचे दर्शन घडवले. काल देवस्थानच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात उच्चांकी भाविकांची संख्या ठरली असेल. अंदाजे सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी काल देवी दर्शन घेतले.

आज दुपारी देवस्थान समितीच्या यज्ञ शाळेत होमहवनाला प्रारंभ झाला. वेदमंत्राचा घोष भाविकांचा जयजयकार देवीच्या निरोप घेण्याची आठ दिवस साधना करीत असलेल्या महिला भाविकांची घरी परतण्याची लगबग झाली. असे वातावरण नवरात्रोत्सवातील पावित्र्यात भर घालणारे ठरले.

यावेळी भूषण साखरे, सुहास रामदासी, भास्कर देशपांडे, महेश झेंड, नागेश घायाळ, प्रवीण जोशी, नारायण सुलाखे या पुरोहितांनी पौरोहित्य केले. काशिनाथ पवार यांनी संबळ तर गोपीनाथ शिंदे यांनी पारंपारिक सेवा सादर केली.

पारंपारिक सेवा सादर केली. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी एकादशीच्या दिवशी देवीची यात्रा असून शुक्रवारी कलाकारांच्या हजर्‍या व कुस्त्यांचा हंगामा होऊन कोजागिरी पौर्णिमेला यात्रा उत्सवाची सांगता होईल. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांचेसह सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे, मुख्य लेखापाल संदीप घुले यासर्व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply