Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

सुसरे येथील दोघांचा अपघातात मृत्यू

एक जखमी । दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक

पाथर्डी । वीरभूमी- Nov 14, 2022 • 12:42 AM 5826 views
दुचाकीवरून चाललेल्या तीघां मित्रांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात सुसरे ते अमरापूर रोडवरील म्हसोबा वस्ती जवळ शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

या अपघातात नामदेव बबन आठरे (वय 28) व विजय मारुती मिसाळ (वय 22, दोघे रा. सुसरे, ता. पाथर्डी) हे दोघे मयत झाले तर आदेश शेषराव कंठाळी (वय 21, रा. सुसरे) हा गंभीर जखमी झाला आहे.

शनिवार दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान वरील तिघे मित्र दुचाकीवरून सुसरे येथे जात होते. दरम्यान अमरापूर ते सुसरे रोडवरील म्हसोबा वस्ती जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात नामदेव आठरे व विजय मिसाळ हे ठार झाले तर आदेश कंठाळी हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अपघात घडल्यानंतर वरील तिघांना शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी आठरे व मिसाळ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तर जखमी आदेश कंठाळी याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

या अपघाताच्या घटनेनंतर सुसरे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply