Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ताजनापूर सिंचन योजनेबाबत आ. राजळे यांची महत्वाची माहिती

शेवगाव शहराला जोडणार्‍या प्रमुख मार्गाबाबतही दिली माहिती

शेवगाव । वीरभूमी- Nov 16, 2022 • 12:06 AM 979 views
ताजनापुर सिंचन योजना कामासाठी 108 कोटींचे टेंडर झाले असून यावर्षी 13 कोटींची तरतूद झालेली आहे. आतापर्यंत या योजनेचे वितरण कुंडापर्यंतची सर्व कामे झाली असून आता शेतकर्‍यांच्या शेतापर्यंतच्या पाईपलाईनची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर मिरी-शेवगाव, शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई व शेवगाव-तिसगाव या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून आठवडाभरात ही कामे सुरु होतील, अशी माहिती आ. मोनिकाताई राजळे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील खामपिंप्री येथील हनुमान मंदिरासमोर 15 लक्ष किंमतीचे सभामंडप, कोळगाव व हसनापुर येथे प्रत्येकी 10 लक्ष रुपये किंमतीचे सभामंडपचे भूमिपुजन आ. मोनिकाताई राजळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, भाजपा-सेना युतीच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये मोठा विकास निधी आणला. परंतू महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये पुरेसा निधी न आल्याने विकासकामांना खिळ बसली. परंतू आता पुन्हा राज्यात आपले सरकार आल्याने मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, मारुती महाराज झिरपे, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, सुनिल रासने यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी महिला तालुका अध्यक्षा आशाताई गरड, सरचिटणीस भिमराज सागडे, राजेंद्र डमाळे, बाबासाहेब किलबिले, संजय खेडकर, डॉ. लवांडे, संभाजी कातखडे, साईनाथ झिरपे, सुरेश नेमाणे, बाळासाहेब झिरपे, शोभाताई ढाकणे, लक्ष्मण इसारवाडे, अनिता उंदरे, गणेश ढाकणे, नवनाथ ढाकणे, अर्जुन ढाकणे, दादासाहेब भुसारी, लक्ष्मण देवढे, शरद चाबुकस्वार, लक्ष्मण दसपुते, श्रीरंग गोर्डे, दिलीप विखे, ज्ञानदेव मुळे, बाबा सावळकर त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक आदी उपस्थीत होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply