Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मोहटा देवस्थान विश्वस्तांच्या निवडी जाहीर

मोहटा गावातील 5 विश्वस्तांसह भाविकांमधून 5 विश्वस्तांची निवड

अहमदनगर । वीरभूमी- Nov 24, 2022 • 10:58 PM 2469 views
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटा (ता. पाथर्डी) येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या नूतन विश्वस्तांची निवड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें यार्लगड्डा यांनी केली. या विश्वस्तांमध्ये पाच विश्वस्त हे मोहटा गावातील तर पाच विश्वस्त हे भाविकांमधून निवडण्यात आले. ही निवड 2025 पर्यंत असणार आहे.

श्रीक्षेत्र मोहटा येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी तब्बल 276 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये मोहटा गावातील 89 तर भाविकांमधून 187 जणांनी अर्ज दाखल केले होते.

विश्वस्त पदासाठी दाखल केलेल्या अर्जदारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आज निवडी जाहीर करण्यात आल्या. मोहटा गावातील विश्वस्तामधून शशीकांत रामनाथ दहिफळे, बाळासाहेब किसन दहिफळे, प्रतिभा नितीन दहिफळे, विठ्ठल आजिनाथ कुटे, अक्षय राजेंद्र गोसावी यांच्या निवडी करण्यात आल्या.

मोहटे गावाव्यतिरिक्त भाविकांमधून विश्वस्त म्हणुन श्रीराम गंगाधर परताणी (सोमवार पेठ, पुणे), अ‍ॅड. कल्याण दगडू बडे (जालना रोड, औरंगाबाद), डॉ. श्रीधर मधुकर देशमुख (कसबा पेठ, पाथर्डी), अनुराधा विनायक केदार (खंडोबा माळ, पाथर्डी), अ‍ॅड. विक्रम लक्ष्मण वाडेकर (रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) यांच्या निवडी करण्यात आल्या.

मोहटा गावातील 5 व मोहटा गावाव्यतिरीक्त भाविकांमधून 5 अशा 10 विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडी 2022 ते 2025 अशा तीन वर्षासाठी असणार आहेत. या नूतन विश्वस्ताचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply