Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कुस्त्यांचा थरार ः मल्लांनी अकोलेकरांची मने जिंकली

अकोले तालुका तालीम संघाच्या उत्कृष्ट नियोजनाचे होतेय कौतुक

अकोले । वीरभूमी - Nov 28, 2022 • 08:35 AM 1616 views
अकोले तालुका तालीम संघ व अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाजपचे अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले येथे 65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून निवड चाचणी गादी विभागातील स्पर्धा रविवारी अकोले येथे पार पडल्या.

पहिल्या दिवशी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. वैभवराव पिचड यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी अ‍ॅड. के. डी. धुमाळ, शिवाजीराजे धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजाभाऊ गोडसे, राहूल देशमुख, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, अकोले तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ, उपाध्यक्ष श्याम शेटे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील तालीम संघाचे तालुकाध्यक्ष, अकोले चे सर्व नामवंत पैलवान उपस्थित होते.

गादी विभागातील निवड चाचणीसाठी जोरदार सुरुवात झाली. आज 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92 व 97 या वजन गटामध्ये मल्ल एकमेकाला भिडले. काहींनी आपल्या स्पर्धकाला चितपट केले तर काहींनी गुणांवर विजय मिळविला. त्यांना माजी आमदार वैभवराव पिचड व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

अकोले तालीम संघाच्या वतीने या जिल्हा निवड चाचणीसाठी सुंदर व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. त्याचे सर्वानी कौतुक केले. अनेक मल्लांनी अकोलेकरांची मने जिंकली व अकोलेकरांनी त्यांना दिलखुलास प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढविला.

रविवारी सकाळी स्पर्धेत सहभागी होणार्‍या मल्लांचे वजन करण्यात आले, व त्यानुसार प्रत्येक वजनाप्रमाणे गट पाडण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. आज सोमवार दि. 28 रोजी माती विभागातील सर्व कुस्त्या होणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बबलू धुमाळ, श्याम शेटे, बाबासाहेब नाईकवाडी, संतोष देठे, अनिकेत कडलग, संकेत शेटे, संतोष घोलप, यश मोरे, संदीप एलमामे, अथर्व गायकवाड, राहुल तपासे, रामेश्वर धुमाळ, अजिंक्य कदम, आकाश माळवे, शाहरुख शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. या कुस्ती स्पर्धेचे सुंदर निवेदन अनुभवी शंकरराव पुजारी यांनी करून सर्वांचे मने जिंकली.

निकाल ः 65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तथा महाराष्ट्र केसरी अधिवेशनासाठी अहमदनगर जिल्हा निवड चाचणी गादी विभागातील स्पर्धा अकोले जिल्हा अहमदनगर येथे पार पडल्या. या निवड चाचणीचा निकाल पुढीलप्रमाणे- 57-पै. अभिजित वाघुले, 61-पै. ऋषीकेश उचाळे, 65-पै. गणेश शेटे, 70-पै. संदीप लटके, 74-पै. महेश फुलमाळी, 79-पै. आकाश घोडके, 86-पै. ऋषीकेश लांडे, 92-पै. तुषार सोनवणे, 97 - पै.अनिल ब्राम्हणे, महाराष्ट्र केसरी गट - पै. सुदर्शन कोतकर यांची निवड झालेल्या सर्व विजेत्या पैलवानांचे माजी आमदार वैभवराव पिचड व सर्व मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply