Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर

नेवासा । वीरभूमी- Dec 01, 2022 • 02:37 PM 1012 views
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे सन 2021-22 या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणार्‍या पत्रकारास व साहित्यास तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने 1995 पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. शनिवार दि.1 डिसेंबर 2022 रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन 2021-22 च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी घोषित केले.

दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार- जेष्ठ पत्रकार अभिजित कांबळे (संपादक, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन, मुंबई) यांना जाहीर झाला असून साहित्य पुरस्कार 2021-22 पुढील प्रमाणे - दयाराम पाडलोस्कर, गोवा (बवाळ-कथा), प्रा. शिवाजीराव बागल, सोलापूर (ज्ञानमंदिरातील नंदादीप-कादंबरी), डॉ. नारायणा भोसले, मुंबई (देशोधडी -आत्मचरित्र), श्रीमती. सारिका उबाळे, अमरावती (कथार्सिस-काव्य), भारत सातपुते, लातूर (आम्ही फुले बोलतोय-बालकाव्य), प्रा. वसंत गिरी, बुलढाणा (तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस-चरित्र),

डॉ. प्रतिभा सुरेश जाधव, नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे, पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके, सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई, मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे, पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध) यांना जाहीर झाले आहेत.

वरील पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी नेवासा तालुक्यातील तरवडी येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षीत यांचे हस्ते प्रदान केले जाणार आहेत, अशी माहीती दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply