Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या इमारती

नवीन 59 तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी 15 कोटी 75 लाख रुपये मंजूर ः आमदार मोनिका राजळे यांची माहिती

शेवगाव । वीरभूमी- Dec 02, 2022 • 05:01 PM 5051 views
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नवीन 59 तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी 15 कोटी 75 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. यामध्ये शेवगाव तालुक्यातील 34 गावातील तलाठी कार्यालय बांधकामासाठी 9 कोटी 18 लाख व पाथर्डी तालुक्यातील 25 गावातील तलाठी कार्यालयासाठी 6 कोटी 57 लाख रुपये रक्कम मंजूर झाली आहे.

या कामासाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रस्तावीत केलेल्या सर्व प्रस्तावांना शासन निर्णय, क्र.बीएलडी-2022/प्र.क्र.116/ई8 नुसार महसूल विभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.

तलाठी कार्यालय बांधकामांसाठी निधी मिळालेल्या गावांमध्ये शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक, अमरापुर, खरडगाव, ठाकुरनिमगाव, कोळगाव, आखेगाव, जोहरापुर, देवटाकळी, शहरटाकळी, भाविनिमगाव, दहिगाव-ने, बोधेगाव, लाडजळगाव, राणेगाव, गोळेगाव, बालमटाकळी, कांबी, हातगाव, खडके, मुंगी, आंतरवाली बु., ठाकुरपिंपगाव, राक्षी, ढोरजळगाव-शे, ढोरजळगाव-ने, सामनगाव, आव्हाणे बु., वाघोली, निंबे, दहिफळ, खुंटेफळ, खानापुर, गदेवाडी, घोटण या गावांचा समावेश आहे.

तसेच पाथर्डी तालुक्यातील सांगवी बु., मढी, निंवडूगे, साकेगाव, पाडळी, आल्हणवाडी, जाटदेवळे, चिंचपुर इजदे, करोडी, कारेगाव, टाकळीमानुर, अकोला, चिंचपुर पांगुळ, जांभळी, येळी, भालगाव, सुसरे, दुलेचांदगाव, निपाणी जळगाव, लोहसर, मोहोज बु., मांडवे, शिराळ, आडगाव, कासार पिंपळगाव या गांवाचा तलाठी कार्यालय बांधकामाकरीता समावेश आहे.

ग्रामीण भागात तलाठी शासन व नागरिक, शेतकरी यांच्यामधील महत्त्वाची भूमिका निभावत असतो. जमिनी संबंधित अभिलेखन सतत अद्यावत राहावीत तसेच वेगवेगळ्या नोंदीसाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. गावात तलाठी कार्यालय झाल्याने सामान्य नागरिकांचे कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल. गेले अनेक वर्षापासून या गावात तलाठी कार्यालय इमारत नसल्याने गैरसोय होत होती.

मागील वर्षापासून या कार्यालयाचे इमारत बांधकाम होण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री झाल्यानंतर या प्रस्तावास गती मिळून मागणीनुसार सर्व प्रस्तावीत तलाठी कार्यालयांना त्यांनी मंजूरी दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply