Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

तिसगाव, भालगाव, जिरेवाडीत धक्कादायक निकाल । कोरडगावात वंचित

पाथर्डी । वीरभूमी- Dec 20, 2022 • 01:11 PM 7723 views

पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर कोरडगाव सरपंचपदावर वंचित बहुजन आघाडी तर जिरेवाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाने सरपंचपदावर विजय मिळवला आहे.

पाथर्डी तहसील कार्यालयात आज मंगळवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सोनोशी ग्रामपंचायतीमध्ये गोकुळ दौंड यांच्या पॅनलसह सरपंचपदावर विजय मिळवला. सोनोशीच्या सरपंचपदी सुनंदा जगनाथ काकडे या विजयी झाल्या. कोळसांगवीच्या सरपंचपदी सुरेखा युवराज फुंदे या विजयी झाल्या. वडगाव येथे सरपंचपदी आजीनाथ विश्वनाथ बडे, मोहरी येथे सरपंचपदी आशाबाई वाल्हेकर या विजयी झाल्या.

जिरेवाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाअध्यक्ष मुकुंद आंधळे यांच्या पॅनलने कल्पजित डोईफोडे यांच्या पॅनलचा पराभव केला. येथे सरपंचपदी लक्ष्मी महादेव आंधळे यांचा विजय झाला. तर वैजू बाभळगाव येथे अपक्ष ज्योती घोरपडे या सरपंचपदी विजयी झाल्या. कोल्हार ग्रामपंचायत निवडणुकीत माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे यांच्या पॅनलचा पराभव झाला तर स्व. मोहनराव पालवे यांचा पॅनल विजयी झाला. तर येथे सरपंचपदी राजू बन्सी नेटके हे विजयी झाले.

तिसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काशिनाथ पाटील लवांडे यांच्या अनेक वर्षांच्या सत्तेला खिंडार पडले. येथे विरोधी गटाच्या शेख मुनिफा इलियास यांचा सरपंचपदी विजय झाला.  कोरडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार साखराबाई नामदेव म्हस्के या विजयी झाल्या. टेभुर्णी येथे मिथुन दगडु डोंगरे गटाचा यांच्या गटाच्या रोकडे सत्यभामा भानुदास या सरपंचपदी विजयी झाल्या.

निवडुंगे येथे वैभव विठ्ठल देशमुख हे सरपंचपदी विजयी झाले.  भालगाव येथे भाजपाचे तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे सरपंचपदी पोपट विलास रोकडे विजयी झाले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply