Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

राष्ट्रवादी, भाजपाने गड राखले तर जनशक्तीकडे 1 सरपंचपद

शेवगाव । वीरभूमी- Dec 20, 2022 • 12:25 PM 7365 views

शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. जनतेतून सरपंचपद निवडण्यात येणार असल्याने कोण विजयी होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये राष्ट्रवादी, भाजपाने गड राखले तर, जनशक्तीला 1 सरपंचपदावर विजय मिळवता आला. तर रावतळे-कुरुगावचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकला नवनाथ कवडे यांनी अलिप्त असल्याचे सांगितले.

सरपंचपदाची जनतेतून निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये प्रभुवाडगाव, खामगाव,  जोहरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी, दहिगावने, वाघोली, सुलतानपूर, अमरापूर येथे निवडणूक झाली. आखेगाव सरपंचपदावर जनशक्ती विकास आघाडीचा विजय झाला. तर कुरुगाव-रावतळे येथे चंद्रकांत नवनाथ कवडे यांनी अलिप्त असल्याचे सांगितले.

सरपंचपदाचे विजयी उमेदवार- ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव (प्रभुवाडगाव), विद्या अरूण बडधे (खामगाव), स्नेहल रोहन  लांडे (जोहरापूर), शितल मंगेश थोरात (खानापूर), मनिषा राजेंद्र आढाव (भायगाव), काकासाहेब मुरलीधर घुले (रांजणी), सुनिता देवदान कांबळे (दहिगाव-ने) असे आहेत.

सरपंचपदाचे विजयी उमेदवार- सुश्मिता  उमेश भालसिंग (वाघोली), सविता विजय फलके (सुलतानपूर), आशाताई बाबासाहेब गरड (अमरापूर) असे आहेत. तर जनशक्ती आघाडीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार - आयोध्या शंकर काटे (आखेगाव) असे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात होता. विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत आहे.

मागील काही महिण्यापासून जनशक्तीचे अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी तालुक्यात प्रत्येक गावात जावून संघटन वाढविले. त्याचा परिपाक म्हणुन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनशक्तीचे खाते खोलत आखेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विजय मिळवता आला. तर राष्ट्रवादी व भाजपाने आपआपले गड राखले आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply