Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

चार कॉफी शॉपला कर्जत पोलिसांचा दणका

गैरप्रकारांस उत्तेजन देत असल्याचा ठपका

कर्जत । वीरभूमी - Dec 19, 2022 • 10:00 AM 997 views

तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी. तसेच अशी कृत्ये करण्यास जागा उपलब्ध करून देणे. त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे आकारणार्‍या कर्जत शहरातील चार कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.


कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स येथील कॉफी अन् बरच काही, मुनलाईट, फ्रेंडशिप आणि द कॉफी पॉईंट अशी कॉफी शॉप आहेत. याठिकाणी मुला-मुलींना, तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच कॉफीशॉपमध्ये बसून ज्यादा पैसे देत अनेक चुकीच्या गोष्टी होत असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना प्राप्त झाली होती.


सदरच्या तक्रारीवरून पोनि. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकारी, पोलीस जवान आणि महिला पोलीस कर्मचार्‍यांनी नुकतेच स्टिंग ऑपरेशन केले. कॉफीशॉपमध्ये कॉफी पिण्याच्या बहाण्याने आलेले युगुल, तरुण-तरुणी बराचवेळ बसतात. त्यामुळे कॉफी शॉप चालकांनी खास युगुलांसाठी वेगळे दरपत्रक देखील बनवले असल्याचे समोर आले. यासाठी खास बैठक व्यवस्था असून तरुण तरुणींना अश्लील हावभाव, अश्लील कृत्ये, गैरप्रकार करणे सहज शक्य होत असल्याचे निदर्शनास आले.


यासह कॉफीशॉप मालकाकडुन विनापरवाना विविध खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याचे दिसून आले.  कर्जत पोलिसांनी ‘महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कॉफी शॉपचालक पांडुरंग शिवाजी चव्हाण (कोरेगाव), सुमित सुदाम नेटके (बर्गेवाडी), महेश संजय बरबडे (गायकरवाडी) आणि आकाश विलास तोरडमल (बहिरोबावाडी) या चौघांवर कारवाई केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सलीम शेख, शाहूराज तिकटे, राणी व्यवहारे, रानी पुरी आदींनी केली आहे.

याबाबत पोनि. चंद्रशेखर यादव म्हणाले की, कॅफे चालकांनी तयार केलेली वेगळी बैठक व्यवस्था काढण्यास सांगितले आहे. यासह पालकांनीही आपली पाल्ये शाळेत-महाविद्यालायतच जातात का? ती काय करतात ? याबाबत वेळोवेळी खात्री करावी. आपल्या मुलांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करून ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत यासाठी यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply