Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

आरोग्याचा संदेश देत शेवगाव सायकल क्लबचे देवगड दर्शन

शेवगाव ते देवगड सायकल प्रवास दोन तासात पूर्ण

 शेवगाव । वीरभूमी - Dec 17, 2022 • 02:51 PM 914 views

शेवगाव ते श्रीक्षेत्र देवगड असा सायकल प्रवास दोन तासात पूर्ण करत शेवगाव सायकल क्लबने आरोग्याचा संदेश देत भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. यामध्ये 16 सायकलिस्ट सहभागी झाले होते. शेवगाव सायकल क्लबने आतापर्यंत वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून आरोग्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचाच भाग म्हणून श्रीक्षेत्र देवगडपर्यंत 16 सायक्लिस्ट यांनी सायकलवर प्रवास करून मार्गामध्ये विविध लोकांना आरोग्याचा संदेश दिला. जीवनात आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याचा विचार करणे महत्वाचे आहे. प्रारंभी शेवगाव मधून डॉ. श्रीकांत देवढे व डॉ. निखिल काकडे यांनी सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

कुठेही न थांबता एका तासामध्येच 25 किलोमीटर प्रवास पूर्ण करून भेंडा येथे पोहचल्यानंतर येथील स्वागत हॉटेल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे व त्यांच्या पत्नी भेंडा बुद्रुकच्या माजी सरपंच संगीताताई गव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी गणेश गव्हाणे शुभेच्छा देत म्हणाले की, या धकाधकीच्या जीवनामध्ये मोटरसायकलच्या खाली न उतरणारा व्यक्ती आरोग्याच्या बाबतीत मागे पडत आहे. परंतु आपण आरोग्य हीच धनसंपदा म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणसाठी प्रयत्न करत आहात. हा आदर्श नवीन पिढी समोर ठेवला आहे. आज माणसाकडे पैसा, धनसंपदा सर्वकाही आहे, परंतु आरोग्य नाही.

अतिशय आनंददायी वातावरणात झालेला हा प्रवास नेवासा फाटा येथेही विठ्ठल साडी सेंटरचे बाबासाहेब भूमकर मेजर यांनी चहापानाची व्यवस्था करून सत्कार केला. त्यानंतर सायकल प्रवास करत श्रीक्षेत्र देवगड येथे पोहोचल्यावर दत्तगुरूंचे दर्शन घेऊन महंत भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर स्नेहभजनाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवास पुन्हा दोन तासात पूर्ण केला.

या स्तुत्य उपक्रमात डॉ. संदीप बोडखे, डॉ. जगदीश कुलकर्णी, निळकंठ लबडे, आबा नेमाने, डॉ. प्रदीप उगले, विनोद शेळके, संजय बडे, प्रा. मच्छिंद्र आधाट, कैलास जाधव, राम नेव्हल, भागनाथ काटे,  भारत दहिवाळकर, सुभाष पवार, यशवंत तुपे, प्रशांत सुपेकर, प्रदीप बोडखे आदीसह सायकल रायडर्स यांनी सहभाग घेतला. नियोजित वेळेत ही आपली देवदर्शन यात्रा आनंदवारी संपन्न झाली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply