Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अगस्तीचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे यांचे निधन

अकोले तालुक्यावर शोककळा । शुक्रवारी सकाळी होणार अंत्यविधी

 अकोले । वीरभूमी - Jan 12, 2023 • 11:23 PM 3059 views

अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोकराव भांगरे यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी घेऊन जात असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

अशोकराव भांगरे यांनी पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आदिवासी विकास महामंडळ सदस्य, प्रकल्प समितीचे सदस्य, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदावर त्यांनी काम केले आहे. तसेच जनता दल, काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या पक्षात त्यांनी काम केले.

तालुक्यात त्यांना मानणारा मोठा गट आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे ते कट्टर राजकीय विरोधक होते. तर कधी त्यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ नेते होते. मात्र त्यांनी कधीही राजकीय जीवनात विरोधकांविषयी अपशब्द वापरले नाहीत.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दुःख व्यक्त केले असून माझ्यानंतर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारा अशोक हाच वारसदार होता. त्यांच्या निधनाने दुःख झाल्याचे ते म्हणाले. तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही दुःख व्यक्त केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील सर्व नेते व कार्यकर्ते यांनी दुःख व्यक्त केले.

अशोकराव भांगरे यांच्यावर उद्या दि. 13 रोजी सकाळी शेंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply