Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

तिसगावचा आठवडे बाजार ओट्यावर भरविणार

ग्रामविकास अधिकार्‍याचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे । पोलिस प्रशासनाची घेणार मदत

तिसगाव । वीरभूमी - Feb 17, 2023 • 12:57 AM 1207 views

तिसगावचा आठवडे बाजार नियोजित ओट्यावर भरविण्याच्या मागणीसाठी सुभाष खंडागळे, वाल्मिक गारुडकर व सिराज शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दरम्यान गटविकास अधिकारी, पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करुन पुढील आठवड्यापासून तिसगावचा आठवडे बाजार ओट्यावर भरविला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

 पाथर्डी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या तिसगावचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर न भरता महामार्गालगत भरत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील बाजारामुळे तिसगावचे नाव बदनाम होत आहे.

हे थांबविण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी रोजीचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर भरविण्याच्या मागणीसाठी सुभाष खंडागळे, वाल्मिक गारुडकर व सिराज शेख यांनी तिसगाव ग्रामपंचायत प्रशासनाला उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र आंदोलन कर्त्यांनी उपोषणाचा इशारा देऊनही गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा ओट्यावर बसविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले.

यामुळे आठवडे बाजार हा पुन्हा ओट्यावर न भरता महामार्गालगत भरल्याने निवेदनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धांदल उडाली.

दुपारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करत पुढील गुरुवारपासून आठवडे बाजार ओट्यावर भरविण्याबाबत उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र याबाबत लेखी द्यावे, अशी मागणी केली.

यावर तिसगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी पोलिस प्रशासन, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने दि. 23 फेब्रुवारीपासूनचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर भरविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी उपोषणकर्त्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

...तर गुन्हे दाखल करा

तिसगावच्या आठवडे बाजाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हद्द ठरवून द्यावी. महामार्गालगत बाजार करू बसणार नाहीत, याबाबत विक्रेत्यांना सुचना द्याव्यात. गावामध्ये भोंग्यावरुन याबाबत जाहीर सुचना द्याव्यात. एवढे करुनही बाजारकरु ओट्यावर बसण्याऐवजी महामार्गालगत बसल्यास त्यांच्यावर कलम 353 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत, अशी सुचना सपोनि. प्रवीण पाटील यांनी ग्रामविकास अधिकार्‍याना केल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply