Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

श्रीक्षेत्र अगस्ति ऋषी आश्रमात यात्रोत्सव

खा. सदाशिव लोखंडे व आ. किरण लहामटे यांच्याहस्ते सपत्निक महापूजा

 अकोले । वीरभूमी - Feb 17, 2023 • 10:43 PM 1230 views

महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र अगस्ति ऋषी आश्रमात शनिवारी दि. 17 रोजी पहाटे 3 वाजता महापूजेचा मान खा. सदाशिव लोखंडे व नंदाबाई लोखंडे आणि आमदार डॉ. किरण लहामटे व पुष्पा लहामटे यांना देण्यात आला आहे. श्री अगस्ति ऋषींच्या मूर्तीस ते सपत्निक पहाटे 3 वाजता पूजा करून महाभिषेक घालतील.

महाशिवरात्रीनिमित्त शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 4 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कुस्तीगीरांचा कुस्त्यांचा थरार पहायला मिळेल, अशी माहिती श्रीक्षेत्र अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, सचिव सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसनराव लहामगे, विश्वस्त व बाजार समिती सभापती परबत नाईकवाडी, विष्णू महाराज वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, मच्छिंद्र संतू भरीतकर, भानुदास तिकांडे, दिपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले, उद्योजक संभाजी भिंगारे, म्हतारबा भांगरे,

नवनाथ गायकवाड, जयप्रकाश महाले, रामकृष्ण शेणकर, मारूती भिंगारे, रमेश नवले, सुरेश वाकचौरे, बाळासाहेब फोडसे, रावसाहेब देशमुख, गोविंद वाळुंज, मधुकर वाकचौरे, संपत शेटे, किसन नाईकवाडी, बाळासाहेब घोडके, रामनिवास राठी, सतीश बुब, अनिल  किसनराव गायकवाड, किसन शेटे, दिगंबर म्हसे बद्रीनारायण मुंदडा, दामू तिकांडे व व्यवस्थापक रामनाथ मुतडक व सामाजिक संघटनेकडून यात्रा शांततेत पार पाडण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.

यानिमित्त दररोज पहाटे 4 ते 6 वाजता काकडा भजन, 7 ते 10.30 वाजता श्री. ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 3 वाजता नियमाचे भजन, दुपारी 3 ते 5 वाजता कथाकर हभप. राजेंद्र महाराज नवले यांची संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, सायंकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ, रात्री 7 ते 9 वाजता हरिकिर्तन व महाप्रसाद व तद्नंतर हरिजागर असे कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी 19 फेब्रुवारीस सकाळी 10 ते 12 वाजता हभप. राजेंद्र महाराज नवले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, असेही धुमाळ यांनी स्पष्ट केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply