Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

खोटी माहिती पसरवून बदनामी करणार्‍यावर गुन्हा दाखल

वीरभूमीच्या बातमीच्या हेडलाईनमध्ये केली छेडछाड । पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 पाथर्डी । वीरभूमी - Feb 26, 2023 • 12:54 AM 1032 views

शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आग लागल्याची बातमी सर्वप्रथम ‘वीरभूमी’ने दिली होती. मात्र या बातमीच्या हेडलाईनमध्ये बदल करुन ‘70 पेक्षा जास्त कामगार मृत्यूमुखी’ ही ओळ टाकून व्हॉटसअप ग्रुपवर लिंकसह शेअर करुन बदनामी करणार्‍यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आग लागल्याची बातमी ‘वीरभूमी’ने प्रसिद्ध केली होती. मात्र या बातमीच्या हेडिंगमध्ये बदल करुन ‘70 पेक्षा जास्त कामगार मृत्यूमुखी’ अशी ओळ टाकून ती बातमी अज्ञाताने वीरभूमीच्या लिंकसह इतर व्हॉटसअ‍ॅप गु्रुपवर शेअर केली. मात्र बातमीच्या लिंकमध्ये अशी कोणतीही माहिती नसल्याने अनेकांनी फोन करुन याबाबतची माहिती वीरभूमीचे संपादक महादेव दळे यांना दिली.

आगीमध्ये अशी कोणतीही घटना घडली नसतांना वीरभूमी व कारखाना प्रशासनाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले. यामुळे वीरभूमीचे संपादक महादेव दळे यांनी तातडीने सायब क्राईमशी संपर्क केला असता संबधित व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले.

यामुळे वीरभूमीचे संपादक महादेव दळे यांनी तातडीने पाथर्डी पोलिस ठाण्यात जावून चुकीची माहितीची ओळ वीरभूमीच्या लिंकला जोडून ती शेअर करुन वीरभूमीची बदनामी करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोना. अनिल बडे हे करत आहेत.

सद्य परिस्थितीत इथेनॉल प्रकल्पाला आग लागली त्यावेळी 32 कामगार तेथे काम करत होते. आग लागल्यानंतर सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शेवगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन रणजितभैय्या मुळे यांनी दिली. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात काही व्यक्तींकडून बदनामी करण्याच्या दृष्टीने अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवा कोणीही पसरवू नये, असे आवाहन रणजित मुळे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply