Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आठ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

सर्व कामागारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश । गंगामाईच्या इथेनॉलला भिषण आग

 शेवगाव । वीरभूमी - Feb 26, 2023 • 12:05 PM 3672 views

तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. ही आग इथेनॉलच्या टाक्यांना लागल्याने मोठे स्फोट होत होते. यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या अथक आठ तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

तत्पुर्वी आगीची घटना घडताच तेथे काम करणार्‍या 32 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या आगीमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भिषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज गंगामाई साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजितभैय्या मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आग लागली त्यावेळेस कारखान्यात 32 कामगार काम करत होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र स्फोट होवून पळापळ झाल्याने दोन कामगार किरकोळ जखमी झाले. त्यांना शेवगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

इथेनॉलला आग लागल्याने त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे परिसरातील सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहुन आलेले अग्निशमन बंब शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान तब्बल आठ तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये कारखान्याने कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

गंगामाई कारखान्याला आग लागल्याची माहिती कळताच तहसीलदार छगन वाघ, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोनि. विलास पुजारी यांच्यासह कारखाना प्रशासन, महसूलचे कर्मचारी, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बारीक लक्ष ठेवून होते.

कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे, समीर मुळे यांनी कामगारांना धीर देत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

कारखाना अ‍ॅटोमायझेशिएन असल्यामुळे आग लागली त्यावेळी तेथे 32 कामगार काम करत होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज असून सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून कामगार, परिसरातील ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही अफवा पसरवू नये. - रणजितभैय्या मुळे, कार्यकारी संचालक

खोटी माहिती एडिट करुन बदनामी करणार्‍यावर गुन्हा दाखल

गंगामाई कारखान्याला भिषण आग लागल्यानंतर ‘वीरभूमी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र या बातमीच्या हेडिंगमध्ये अज्ञाताने ‘70 पेक्षा जास्त कामगार मृत्यूमुखी’ अशी ओळ समाविष्ट करुन ती बातमी वीरभूमीच्या लिंकसह इतर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर शेअर केली होती. याप्रकरणी वीरभूमीचे संपादक महादेव दळे यांनी संबधितांवर सायबर क्राईमकडे तक्रार करुन चुकीची माहिती एडिट करुन बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पो.ना. अनिल बडे हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply