Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगाव-पाथर्डीतील या रस्त्यांना मिळाला निधी

दोन्ही तालुक्यातील विविध रस्ता, पूलासाठी 84 कोटी 40 लाखांचा निधी ः आ. मोनिकाताई राजळे

शेवगाव । वीरभूमी - Mar 10, 2023 • 10:56 PM 3166 views

शेवगाव - पाथर्डी मतदारसंघातील रस्ते, पूल व इतर विकास कामांसाठी अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत  84 कोटी 40 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

यामध्ये पाथर्डी येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याकरिता 9 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याचबरोबर शेवगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 37 कोटी 75 लाख रुपये तर पाथर्डी तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांकरिता 37 कोटी 50 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्प मार्च 2023 मध्ये मंजूर झाला आहे.

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रमुख रस्ते व इतर विकास कामाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. शिंदे फडणवीस सरकारने सर्व समावेशक व सर्व घटकांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर करत असताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे ध्येय ठेवले आहे.

वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने शेवगाव-पाथर्डी मतदार संघासाठी भरभरून निधी दिला आहे. पुढील काळातही या विकासाभिमुख शासनाच्या काळात मतदारसंघातील जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.

आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मागणीप्रमाणे अर्थसंकल्प मार्च 2023 मध्ये पुढील प्रमाणे कामांना व कामाच्या रकमेला दिली आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी कांबी रस्ता (कि.मी. 3/00 ते 7/00) करणे (100 लक्ष रूपये), बालमटाकळी ते बाडगव्हाण रस्ता (कि.मी. 10/00 ते 12/00) करणे. (50 लक्ष रूपये), शेवगांव रा.मा. 21 ते तळणी देवी रस्ता (कि.मी. 0/00 ते 3/00) करणे (100 लक्ष रूपये).

 रा. मा. 50 ठाकूर निमगांव फाटा ते ठाकूर निमगांव रस्ता (1/00 ते 3/00) करणे (80 लक्ष रूपये), प्र.जि.मा. 38 ते सालवडगाव- मुर्शदपूर रस्ता करणे (150 लक्ष रूपये), बोधेगाव ते चेडेचांदगाव रस्ता ग्रा.मा. 92 कि.मी. 1/00 करणे (100 लक्ष रूपये), लाडजळगाव ते शेलार वस्ती रस्ता ग्रा. मा. 83 (1 कि.मी.) करणे (50 लक्ष रूपये). शिंगोरी ते थाटे रस्ता (कि.मी. 15/00 ते 17/50) करणे (125 लक्ष रूपये), बोधेगाव ते घुमरेवस्ती रस्ता  (कि.मी. 1/00 ते 2/00) करणे (50 लक्ष रूपये).

    रा.मा. 50 दत्तपाटी ते देवटाकळी रस्ता करणे (100 लक्ष रूपये),    देवटाकळी-वडुले रस्ता (कि. मी. 2/00 ते 5/00) करणे (50 लक्ष रूपये). शहरटाकळी येथील कदमवस्ती ते डोळे वस्ती उर्वरीत रस्ता (50 लक्ष रूपये), राणेगाव-अधोडी रस्ता करणे (60 लक्ष रूपये). भगुर ते आव्हाणे रस्ता करणे (100 लक्ष रूपये), वाघोली ते कामत शिंगवे रस्ता (125 लक्ष रूपये), शेवगाव-खुंटेफळ-ताजनापुर रस्ता (कि.मी.18/00 ते 24/300) करणे (250 लक्ष रूपये).

तिसगाव - शेवगाव - पैठण रस्ता (12/800 ते 14/300 ते 22/300) करणे (250 लक्ष रूपये). भातकुडगाव-ढोरजळगाव रस्ता  (कि.मी. 51/00 ते 54/200) करणे. (250 लक्ष रूपये). शेवगाव - ताजनापुर- दहिफळ रस्ता (दहिफळ गावातील लांबीचे कॉक्रीटीकरण व गटार बांधकाम) (कि.मी. 14/00 ते 18/00) करणे (250 लक्ष रूपये).

शेवगाव- वरुर रस्ता प्रजिमा 164 (कि.मी. 4/300 ते 9/100) करणे (250 लक्ष रूपये). आव्हाणे मळेगाव - भातकुडगाव रस्ता (कि.मी. 12/00 ते 16/00) करणे (200 लक्ष रूपये). शेवगाव-आखेगाव रस्ता (कि.मी. 8/700 ते 12/300) करणे (200 लक्ष रूपये). प्रभुवाडगाव खामपिंप्री - मुंगी रस्ता (आपत्कालीन मार्ग) (कि.मी. 7/400 ते 10/00) करणे (250 लक्ष रूपये). खानापुर-रावतळे- राक्षी - ठाकुर निमगाव रस्ता (कि.मी. 6/00 ते 8/900) करणे (200 लक्ष रूपये).

ढोरजळगाव - आव्हाणे - अमरापुर रस्ता (कि.मी.58/00 ते 62/600) करणे (250 लक्ष रूपये). खुंटेफळ ते दारकुंडे वस्ती रस्ता (ग्रा.मा. 151) 500 मी करणे. (40 लक्ष रूपये), बोधेगाव ते एकबुर्जी पहिलवान वस्ती रस्ता (1.00 किमी) करणे (65 लक्ष रूपये). बोडखे ते ताजनापुर रस्ता ग्रा. मा. 12 रस्ता करणे (30 लक्ष रूपये) या कामांचा समावेश आहे.

पाथर्डी तालुक्यातील सुसरे - पागोरी पिंपळगाव रस्ता येथील पांढरे वस्ती येथे (कि.मी.10/200) जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे (400 लक्ष रूपये),    मौजे सुसरे - पा. पिंपळगाव रस्ता येथील कंठाळी  वस्ती येथे (कि.मी.11/600) जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे (300 लक्ष रूपये), मौजे कोरडगांव येथे कोरडगाव - बोधेगाव रस्त्यावर (कि.मी.7/200 ते 9/200 मध्ये) पुलाचे बांधकाम व रस्त्याची सुधारणा करणे (200 लक्ष रूपये).

मौजे सोनोशी - तोंडोळी रस्ता (सा.क्र. 2/600 मध्ये) सोनोशी गावाजवळ पुल बांधणे (250 लक्ष रूपये), मौजे मढी- पाथर्डी रस्ता (कि.मी. 10/00  ते 15/00) करणे (200 लक्ष रूपये). मौजे निवडूंगे - मढी रस्ता (कि.मी. 0/00 ते 3/00) करणे (80 लक्ष रूपये).

रा.मा.- 54 खेर्डे फाटा ते खेर्डे सांगवी ते पागोरी पिंपळगाव रस्ता करणे (100 लक्ष रूपये). मौजे मोहोजदेवढे ते बहिरवाडी रस्ता ग्रा. मा. 17 कि.मी. 1/00 ते 1/600 करणे (60 लक्ष रूपये). रा. मा. 61 तुळजवाडी ते नांदूर निंबादैत्य रस्ता करणे (150 लक्ष रूपये), मौजे चिंचपुर पांगूळ ते वडगांव वाघेश्वरी जोड रस्ता करणे (40 लक्ष रूपये).

रा. मा. 61 ते माळीबाभुळगाव - हत्राळ ते पाडळी रस्ता करणे. (75 लक्ष रूपये), मोहरी भांडेवाडी ते मोहटादेवी रस्ता (कि.मी. 0/00 ते 3/00) करणे (80 लक्ष रूपये). प्र.जि.मा. 47 ते मानेवाडी रस्ता (कि.मी. 0/00 ते 2/500) करणे (90 लक्ष रूपये). चेकेवाडी-धनगरवाडी-हरीचा तांडा ग्रा. कि. मी. 0/00 ते 3/00 रस्त्याची छोट्या पुलासह सुधारणा करणे. (80 लक्ष रूपये). मौजे माणिकदौंडी - लांडकवाडी रस्ता (कि.मी 0/00 ते 3/00) करणे (100 लक्ष रूपये).

मौजे साकेगाव ते सातपुते वस्ती रस्ता करणे. (60 लक्ष रूपये), मौजे हत्राळ - डांगेवाडी (इ.जि.मा. 254 छोटा पुल व रस्त्याची सुधारणा करणे (50 लक्ष रूपये). इ.जि.मा. 191 (कोरडगाव) ते घुलेवस्ती ते पिंपळगव्हाण रस्ता करणे (110 लक्ष रूपये) याप्रमाणे कामे अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत समाविष्ट आहेत.

शेवगाव - पाथर्डी मतदार संघातील कामांना मंजुरी दिल्याबद्दल आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply