Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील रस्ता कामांना 5 कोटींचा निधी

आ. मोनिकाताई राजळे यांची माहिती

 पाथर्डी । वीरभूमी - Mar 26, 2023 • 09:59 AM 2292 views

मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाकडून निधी मिळणेसाठी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचेकडे कामाची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे लेखाशिर्ष 2515 अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. मोनिकाताई राजळे यांनी दिली.

शासन निर्णयानुसार मंजुर झालेल्या कामांमध्ये शेवगाव तालुक्यातील अंतरवली बु., ते उगले वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 40 लाख रुपये. मडके गावांतर्गत लोखंडी पुल ते सुनिल वडघणे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 40 लाख रुपये.

कांबी येथील गावांतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करण्यासाठी 30 लाख रुपये, गोळेगाव अंतर्गत ढाकणे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख रुपये. दहिगाव-ने अंतर्गत देवळाणे रोड ते काशिद वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख रुपये.  मळेगाव अंतर्गत कर्डिलबा ते मनोज फरताळे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 40 लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.

तसेच पाथर्डी तालुक्यातील खरंवडी कासार येथील जायभाय हॉस्पीटल ते चिंतामणी पर्यंत (जुना नांदूर रस्ता) सह पुलाचे काम करण्यासाठी 40 लाख रुपये. कोरडगाव अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण व बंदीस्त गटार बांधणे 40 लाख रुपये. हनुमानटाकळी अंतर्गत तिरमल वस्ती ते कोपरे वस्ती शिव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख रुपये. ढवळेवाडी अंतर्गत दुसंग वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख रुपये.

अकोले (ता. पाथर्डी) अंतर्गत करोडी रोड ते दातीरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 35 लाख रुपये. येळी गावअंतर्गत बडेवाडी, खंडोबानगर ते पाझर तलाव मार्ग टोल प्लाझा रस्ता मुरुम भराव व खडीकरण करण्यासाठी 25 लाख रुपये असा निधी मिळाला आहे.

त्याच बरोबर पुढील स्थगीती मिळालेल्या 2 कामांनाही या शासन निर्णयात मंजूरी मिळालेली आहे. यामध्ये जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) अंतर्गत तांबुळदेव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 30 लाख रुपये. भालगांव (ता. पाथर्डी)अंतर्गत भालेश्वर हायस्कुल ते मच्छिंद्रनाथगड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

या सर्व विकासकामांना निधी मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे आ. मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply