Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शेवगावच्या आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर । वीरभूमी - Mar 24, 2023 • 11:22 AM 4321 views

पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रवींद्र मोहन कोपरगे (वय 32 वर्षे, रा. इंदिरानगर, शेवगाव) याला अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम 376, 376 (अ) (ब) (2) (आय) (जे) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 4 व 6 नुसार दोषी धरून प्रत्येकी गुन्हयानुसार आरोपीस 10 वर्षे सक्त मजुरी व रूपये 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. सदर खटल्याचा निकाल हा अतिशय कमी कालावधीत म्हणजेच केवळ 9 महिन्यामध्ये लागलेला आहे.

घटनेची थोडक्यात हकीगत की, दि. 1/6/2022 रोजी रात्री 8 चे सुमारास शेवगाव शहरातील इंदिरानगर येथील राहणारा आरोपी रवींद्र मोहन कोपरगे याने 5 वर्षीय वयाची अल्पवयीन पिडीत मुलगी हीस मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याचे घरी नेवून तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक अत्याचार केला. सदर घटनेची फिर्याद पिडीत मुलीचे आईने शेवगाव पोलिसांसमोर दिली.

त्यानुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होवून सदरचा तपास सपोनि. आशिष शेळके यांनी पूर्ण करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पिडीतेची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात नगर परिषद पाथर्डीचे रजिस्टार क्लर्क अंबादास साठे व वैद्यकिय अधिकारी डॉ. गहिनीनाथ खेडकर, सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, सदर घटनेमधील मुलगी ही पाच वर्षे वयाची लहान चिमुरडी आहे. आरोपीने तिला विश्वासात घेवून त्याच्या घरी नेऊन तिच्याशी वाईट कृत्य केले आहे. घटनेनंतर पिडीत मुलीच्या बालमनावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. घटनेस नऊ महिन्याचा कालावधी होवून गेलेला असला तरीही आजही पिडीत मुलीच्या मनावर अतिशय तीव्र स्वरूपात परिणाम झालेला असून ती आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे.

सदरची केस पाहता, नुकतीच उमलत असलेल्या कळीवर आरोपीने असे हीन कृत्य करून तिचे संपूर्ण आयुष्य खुडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत. सदरच्या केसमध्ये सरकारी वकीलांनी पिडीत मुलीशी बोलवून तिच्या मनातील भिती घालवण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. परंतु घटनेमुळे तिच्या मनावरील ओरखडे कधीच बरे होणार नाहीत.

सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा. न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी राणी बोर्डे तसेच पो.कॉ. विजय गावडे, पो. कॉ. खंडागळे यांनी सहकार्य केले. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply