Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जनता योग्य अयोग्य जाणते, विरोधकांना कामातूनच उत्तर

आ. मोनिकाताई राजळे यांचे विरोधकांच्या टीकेला उत्तर । शेवगाव तालुक्यातील विविध रस्ता कामांचा शुभारंभ

 शेवगाव । वीरभूमी - Mar 20, 2023 • 12:50 AM 847 views

जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आहे. जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत आपण अविरतपणे काम करणार असून विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देऊ, जनता योग्य अयोग्य जाणते आहे, जनसामान्यांचा विकास हीच जबाबदारी समजून आपले अविरतपणे कार्य चालू असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

शेवगाव शहरातून जाणार्‍या श्रीरामपूर- नेवासा-शेवगाव-गेवराई रस्त्यावरील भातकुडगाव फाटा ते नित्यसेवा हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आ. राजळे बोलत होत्या. तसेच अमरापूर ते शेवगाव रस्ता- 200 लक्ष, वडुले ते शेवगाव रस्ता- 165 लक्ष, भातकुडगाव फाटा - गेवराई रोड  (नित्यसेवा हॉस्पिटल)- 725 लक्ष या कामाचा शुभारंभही आ. राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, मध्यंतरीच्या कालावधीत शासनाने निधी न दिल्याने रस्त्याच्या प्रश्नावर जनसामान्यांना उत्तर देणे अवघड झाले होते. परंतु शिंदे-फडवणीस सरकार सत्तेवर आल्यानंतर  खोळंबलेली  विकासकामे सुरू झाली आहेत. अंगणवाडी सेविका- मदतनीस, कोतवाल बंधू यांचे मानधनात शासनाने  वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे राज्य शासनाने शेतकरी सन्मान निधी सुरू केला आहे, महिलांना एसटी बस च्या प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे.

तसेच आता शेतकर्‍यांना एक रुपयात पिक विमा भरता येणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कार्य सुरू आहेत. सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून केंद्रातील मोदी शासन व राज्य शासन काम करत आहे. जनसामान्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत. या कार्याची माहिती सर्वसामान्यांना देणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, सा.बां. उप अभियंता प्रल्हाद पाठक, आशाताई गरड, रवींद्र सुरवसे, सुनील रासने, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, शब्बीर शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे, गंगाभाऊ खेडकर, भीमराज सागडे, उमेशराव भालसिंग, हाजी सालार शेख, शिवाजीराव भिसे, सुभाषराव बडदे, निलकंठ कराड, संभाजी कातकडे, अनिलराव सुपेकर, अमोल सागडे,

संभाजी काटे, डॉ. नीरज लांडे, डॉ. श्याम काळे, हरीश भारदे, संदीपराव खरड, कानिफनाथ ढाकणे, संजय खरड, रामहरी घुले, आप्पासाहेब आवटी, सुरेशभाऊ नेमाने, किरण पवार, सचिन म्हस्के, महेश काळे, नारायणराव मडके, महादेव पवार, अनिल वडागळे, कैलास सोनवणे, डॉ. मल्हारी लवांडे, किरण काथवटे, मारुती भागवत, बाबासाहेब धस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्याण देवढे यांनी केले तर सुभाषराव बरबडे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply